II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:57:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     आई बाबानंतर आयुष्याला खरी शिस्त लावण्याचे काम शिक्षक करत असतात. खास या दिवशी शिक्षकांना आपण मान द्यायला हवा. Teacher Guru Purnima Quotes पाठवून तुमच्या शिक्षकांना आनंदी करु शकता. शाळा आणि कॉलेजपासून जरी तुम्ही दूर गेलात तरी देखील शिक्षकांचे स्थान अबाधित असते. अशावेळी खास शिक्षकांसाठी Guru Purnima Wishes.

            गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
शिक्षकांनी दिली आयुष्याला माझ्या या नवी दिशा
अशा माझ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

शिकवताना मला मारलेत तुम्ही इतके,
त्याचे वळ आजही माझ्या शरीरावर असतील,
पण त्याचा फायदा मला आजही दिसत आहे,
धन्यवाद सर
तुमच्यामुळे जगत आहे मी आता हे आयुष्य
धन्यवाद सगळ्यांना दिले तुम्ही मला सुखाचे आयुष्य
शिकवताना तुम्ही मला खूप दिलात मार,
केलेत प्रेम आणि दिलात आधार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

शिक्षकांमुळे होते आयुष्य सुखकर,
त्यांच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर
=========================================

--लीनल गावडे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================