II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:58:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     कधी कधी मित्रही आपल्या आयुष्यात अशा गुरुची जागा बजावतात. जो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो. आयुष्यात एका चांगल्या मित्राची कायम गरज असते. तुमच्या आयुष्यातील अशा खास मित्रांसाठी guru purnima quotes.

              गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
मित्रा, ज्यावेळी मला गरज होती
त्यावेळी दिलास तू आधार
आयुष्याला दिला योग्य आधार
मित्रा तुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

एक मित्रही असतो गुरुच्या जागी,
काऱण त्याच्यामुळेच तुम्हाला
कळते काय
चांगले काय वाईट
चांगला मित्र हा
नेहमी चांगल्या गुरुसारखा असतो
माझ्या आयुष्यातील खास
मित्राला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

मित्रा, चुकीच्या रस्त्यावरुन मला आणले
चांगल्या वाटेवर
धन्यवाद म्हणावे तितके कमीच आहे
मित्रही असतो एक गुरु कारण
त्याच्या योग्य निर्णयाने तुमचे आयुष्य सुंदर होऊ शकते
सुंदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

--लीनल गावडे
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================