II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:00:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

      गुरुंची जागा कोणीही घेऊ शकत नाही. गुरु आपल्याला आयुष्यात कायम प्रेरणा देत असतात. यासाठीच Inspirational guru purnima quotes.

     गुरुची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आयुष्यात तुम्हीही कितीही यशस्वी झाला तरी देखील त्यांचा विसर पडता कामा नये. त्यासाठीच खास respect guru purnima quotes.

               गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
गुरु म्हजणे ज्ञानाचा उगम आणि आहे ज्ञानाचा झरा,
तो असा अबाधित राहावा, ही इच्छा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
तुमची असावी साथ
डोक्यावर तुमचा हात असावा
हीच इच्छा
सुंदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु जगाची माऊली,
सुखाची सुंदर सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुंचे उपकार काही केल्या
फेडता येत नाही,
ते कोणत्याही पैशांनी फेडता येत नाही,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आयु्ष्याच्या प्रत्येक वळणावर दिलीत
तुम्ही मला साथ,तुमचे उपकार कधीही फेडता येत नाहीस
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

सतत ज्वलंत ज्योतीसारख्या
माझ्या पाठिशी असणाऱ्या माझ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
ज्यांनी या दुनियेत लढायला शिकवले,
ज्यांनी मला प्रेरणा दिली अशा माझ्या गुरुंना शुभेच्छा

गुरु माझा सखा,
गुरु माझा सोबती,
त्यांनी दिली प्रेरणा,
तूच खरी जिवंत देवाची मूर्ती
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
जगण्याची दिली नवी दिशा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

वयाचे बंधन नाही,
नात्याला तोड नाही,
अशा माझ्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

--लीनल गावडे
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================