II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:01:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     स्वामी समर्थांसाठी गुरुपौर्णिमा कोट्स-अशक्यही हे शक्य करतात ते आपले स्वामी समर्थ अनेकांचे गुरु आहेत . या गुरुने अनेकांना जगण्याची एक अनोखी दिशा दिलेली आहे. खास त्यासाठी guru purnima quotes.

           गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
खचलेल्या मनाला उभारी देते,
अंधाऱ्या रात्रीत चकाकी देते,
जेव्हा मन माझे स्वामींचे गीत गाते
गरिबाला केलेले दान आणि सदगुरु स्वामींचे मुखात
घेतलेले नाव कधीही वाया जात नाही
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात
हे महत्वाचे नाही,
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
हे जाणून घेणे महत्वाचे आहे
यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
दुसऱ्याचे यश पाहण्याची ताकद असणे
जगण्याला धार आहे,
जीवनाला आधार आहे,
ज्यावेळी सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यांवर आहे.
=========================================

--लीनल गावडे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================