II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-16

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:15:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरुपौर्णिमा हा संपूर्ण भारतामध्ये एक महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो तसेच खूप मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो... (Guru Purnima Status) तसेच भारतीय संस्कृतीत गुरूला आपल्या देवाप्रमाणे मानले जाते.

               गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,

आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Hajar chandnya sodhnyapeksha ekch Chandra sodha,

Aani ekch chandhra sodhnyapeksha ekch surya javal theva,

Guru purnimechya hardik shubhechha..!!


गुरुचा आशीर्वाद,गुरुचा सहवास,

गुरुंच्या चरणी अश प्रार्थना की जगाचा विकास व्हावा,

तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurucha aashirwad,guruchasahavas

Gurunchya charni asha prarthana ki jagacha vikas vhava,

Tumhala saglyana gurupurnimechya shubhechha..!!


गुरुंचा महिमा कसा वर्णावा

शब्द पडती अपुरे तयासाठी

किती केली पराकाष्ठा

कमीच असे त्या गुरुंसाठी

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurunacha mahima kasa varnava

Shabd padli apure  tyasathi

Kiti keli parakatha

Kamich aase tya gurunsathi

Gurupurnimechya shubhechha..!!

अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात

कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात

हॅपी गुरूपौर्णिमा..!!

Akshar aaplyala shikvtata,shabdnacha artha sangantat

Kadhi premane tar kadhi aorshun jivan jagna shikvtat

Happy gurupurnima..!!


संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार

नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार

शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा..!!

Samsakaranchya payavar aahe guruchi dhar

Nie-kshir sam shishyane karava aachar vichar

Shubh guru purnimechya shubhechha..!!


गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा

एकाग्र मनाने मिळेल ज्ञान

चंचल मनाने मिळेल अज्ञान

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurunchya charni basun,jivan jana

Ekagra manane milel dnyan

Chanchal manane milel adnyan

Gurupurnimechya shubhechha.!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================