II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-17

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:17:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     म्हणूनच गुरु पौर्णिमा या दिवशी गुरूचे पूजन देखील करण्यात येते... (गुरू पौर्णिमेच्या संदेश) तसेच अनेक शाळा महाविद्यालय या संपूर्ण भागामध्ये गुरुपौर्णिमा ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते तसेच काही प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असते.

             गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
गुरु ज्ञानाचे मंदिर

गुरु आत्मा परमेश्वर,

गुरु जीवनाचा आधार,

गुरु यशाचे द्वार,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru dnyanache mandir

Guru aatma parmeshwar

Guru jivnachan Aadhar

Guru yashache dyvar,

Gurupurnimechya shubhechha..!!


तुमच्या शिकवणीमुळेच मला मिळाली योग्य दिशा,

सदैव तुमचा हात पाठीशी हवा..!!

Tumchya shikvanimulech  mala milali yogya disha,

sadaiv tumcha hat pathishi hva..!!


गुरु आहेत सगळ्यात महान,

जे देतात सगळ्यांना ज्ञान,

या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru aahet saglyaat mahan,

Je detata saglyanan dnyan,

Ya gurupurnimela karuya tyana prnam

Gurupurnimechya shubhechha..!!


आई वडील प्रथम गुरु,

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Aai vadil pratham guru,

Tyanchyapasun saglyanache astitva suru,

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru mhanje paris aani shisha mahnje lokhand,

Lokhandach son karnarya guruna,

Gurupurnimechya shubhechha..!!


होतो गुरु चरणाचे दर्शन,

मिळे आनंदाचे अंदन,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Hoto guru charnache darshan,

Mile anandache andhan,

Gurupurnimechya shubhehhha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================