चारोळ्या.........

Started by prachidesai, October 13, 2010, 10:36:33 PM

Previous topic - Next topic

prachidesai

१. पहीली भेट------- (सत्यकथा)
म्हणू तशी पहीली भेट,आपल्याला मांडता येते
म्हटले तर दोन डोळ्यात,चांदरात साठवता येते
त्याच डोळ्यांच्या तिरकस नजरेचा,स्पर्श अजून आठवतो
थरथरणार्या आसमंतात त्या,थरथरणारा तुझा शब्द आठवतो
दोन क्षणांच्या गाठीभेटीतील,आसुसलेला तो रस्ता आठवतो
आणि काही क्षणांनंतरचा...
त्याच रस्त्यात आकंठ रक्तात बुडालेला,तडफडणारा तुझा तो जीवही आठवतो

२. हवे तसे हवे त्याला
नाही कधी राहता येत
कितीही मनात आणले तरी
पानगळ नाही थांबवता येत
तू लाख ये म्हणशील
पण पाठी मी फिरू शकत नाही
भावनांच्या होळीमध्ये आज मी
रंगाना थांबवू शकत नाही

३. भास हे भासच असतात
ते कधी खरे नसतात
अर्थ जेव्हा उलगडत असतात
तेव्हाच तर राणी....
प्रेमात दोन जीव बुडत असतात


४. "प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत

५. असच काहीसं होत गं
माझ्याही मनात
पण अस्तित्वाला ते मान्य नव्हते
शहाण्यांच्या या जगात

६. तुझ्या माझ्या मध्ये
फ़क्त इतकेच अन्तर आहे
टोके दोन असली तरी
धागा मात्र एक आहे ....

७. मी तर पापण्या झाकल्या होत्या
मांजर दुध पित तसं
पण शब्दातच मी बुडत राहीलो
पुरात गुरं मरतात तसं

८. शब्द,पूर आणि डोळे
सगळे शेवटी निमित्तच रे
मरण्याआधी आनंदासाठी कसे जगायचे?
याचेच निष्फळ प्रयत्न रे....

........................................... संदिप उभळ्कर




mangesh dhantole