दिन-विशेष-लेख-संत मुक्ताबाई स्मृतीदिन-A

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:36:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                               "संत मुक्ताबाई स्मृतीदिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे.  ४ जुलै-हा दिवस "संत मुक्ताबाई स्मृतीदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात.

                   कौटुंबिक पार्श्वभूमी--

     संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले.

                  गुरुपरंपरा--

     मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.

                 अध्यात्म-जीवन--

     संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते.

                 कार्यकर्तृत्व--

आपले परात्पर गुरू असणाऱ्या गोरक्षनाथांची आपल्या साधनेच्या आधारावर योगमार्गाने भेट घेतली.
ताटीचे अभंग लिहून संत ज्ञानेश्वरांना लेखनप्रवृत्त केले.
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले.
भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळे त्यांना विसोबा खेचर या गुरूंचा लाभ झाला.
नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई ह्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================