दिन-विशेष-लेख-संत मुक्ताबाई स्मृतीदिन-E

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:43:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "संत मुक्ताबाई स्मृतीदिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे.  ४ जुलै-हा दिवस "संत मुक्ताबाई स्मृतीदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

              लोकसाहित्यातील मुक्ताई--

     मुक्ताबाई यांचे व्यक्तिमत्त्व जनमानसाने विविध रुपामध्ये जतन केले आहे. तिचे लहानपण, भावा-बहिणींच्या नात्यातील हृद्यता, चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इ. विविध भूमिकेतून तिचे रूप जतन केले आहे. लहानग्या मुक्ताबाईबद्दल एक विलक्षण असे कौतुक जनमानसामध्ये आहे. तिचे लहानुगेपण, तिचे लडिवाळपण, तिचे देखणेपण स्त्रियांना विलक्षण भावते असे दिसते. 'माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पान' असे कोणी तिच्याबद्दल म्हणते. तर कोणी तिच्या नेणत्या वयाने आणि उडणाऱ्या जावळाने मोहून जाते. 'ग्यानोबा मुक्ताबाई दोघं हिंडती धीरानं, नेणत्या ग मुक्ताबाईचं जावळ उडतं वाऱ्यानं. अहिराणी लोकसाहित्यात म्हटले आहे, 'बहीण ना भाऊ बायपननी पिरीत, ग्यानबाना जोडे, मुक्ताबाईनी सुरत ' दोघांमधील बालपणीच्या प्रेमाचे हे वर्णन आहे. 'माझी मुक्ताई मुक्ताई, दहा वर्साचं लेकरू, चांगदेव योगीयानं, तिले मानला रें गुरु'.मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कारसदृश असा कथाभाग लोकमानसाने अधिक प्रमाणात जतन केला आहे असे दिसते. मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजण्याची घटना देखील जनमाणसाला भावते. 'ज्ञानदेवांच्या घरात, एक किमया घडली, तव गुणगुणे ओवी, म्हणे मुक्ताई देवीला, कैवल्याच्या पाठीवर, रुखमाई लाटे पोळी, व्यर्थ शिणवीशी चूल, भाजले ग मी मांडे काल'

               मुक्ताईंवरील पुस्तके--

मुक्ताई जाहली प्रकाश(संशोधन) - स्वामी प्रा.डॉ तुळशीराम महाराज गुट्टे ( संत साहित्यिक )
आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मिक)
कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) - संशोधन अभ्यासग्रंथ - लेखिका डॉ. केतकी मोडक
धन्य ती मुक्ताई - सुमति क्षेत्रमाडे (कादंबरी)
मी बोलतेय मुक्ताई - नीता पुल्लीवार (ललित)
मुक्ताई - मंदा खापरे (कादंबरी)
मुक्ताई - मृणालिनी जोशी (ललित)
मुक्ताई - शांता परांजपे (ललित)
श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. बाळकृष्ण लळीत
मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर
मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - सुहासिनी इर्लेकर)
मुक्ताई दर्शन - बाबुराव मेहूणकर (आध्यात्मिक जीवनपट)
ऐं मुक्ताईं सोsहम् - बाबुराव मेहूणकर (तत्त्वज्ञानपर)
गाथा दासमुक्ताची:प्रथम खंड - दासमुक्ता-बाबुराव मेहूणकर (स्फुट/आत्मकथनपर)
एक समालोचन - दासमुक्ता/बाबुराव मेहूणकर (मुक्ताईवरील एका पुस्तकाचे समालोचन)[१२][१३]
मुक्ताबाईची अभंगवाणी - डॉ.अशोक कामत, अतुल प्रकाशन, १९८०
श्रीज्ञानेश्वरमहाराजांची मुक्ताबाईस सनद - संपा. श्री.बा.त्र्यं.शाळिग्राम, स्वाध्याय महाविद्यालय प्रकाशन, १९७७
ब्रह्मचित्कला दर्शन अर्थात श्रीमुक्ताबाई चरित्र व गाथा, ले. श्रीनिवृत्ती दौलत वक्ते, १९८०
ताटीचे अभंग - एक विवेचन, ले.डॉ.सदानंद मोरे, श्रीभागवत प्रबोधन संस्था, १९९४
महाराष्ट्र संतकवयित्री, श्री.ज.र.आजगावकर, १९३९
संतकवयित्री, डॉ.इंदुमती शेवडे

                 स्मृतिप्रीत्यर्थ--

     जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून संत मुक्ताईच्या नावावरून मुक्ताईनगर केले आहे.

     पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================