०८-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 08, 2023, 04:55:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०७.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "०८-जुलै-दिनविशेष"
                                -------------------

-: दिनविशेष :-
०८ जुलै
जागतिक अ‍ॅलर्जी प्रतिबंधक दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०११
रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.
२००६
मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर
१९९७
बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
१९५८
बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात 'दो आँखे बारह हाथ' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९३०
किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे 'इंडिया हाऊस'चे उद्‍घाटन
१९१०
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'मोरिया' या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१८८९
'द वॉल स्ट्रीट जर्नल' चा पहिला अंक प्रकाशित झाला.
१८५६
चार्ल्स बर्न याला 'मशिनगन'चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१४९७
वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७२
सौरव गांगुली – भारताचे क्रिकेट कर्णधार, बी. सी. सी. आय. (BCCI)चे अध्यक्ष
१९४९
वाय. एस. राजशेखर रेड्डी – (अविभाजित) आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री
(मृत्यू: २ सप्टेंबर २००९)
१९२८
श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
(मृत्यू: १८ जून १९९९)
१९२२
अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या, ६ व्या लोकसभेतील खासदार (उत्तर मध्य मुंबई). समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न व स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बलात्कारविरोधी कायदा बदलून घेतला; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत वाटे. स्त्रियांना 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्या आग्रही व प्रयत्नशील होत्या.
(मृत्यू: १९ एप्रिल २००९)
१९१६
गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व 'गडसम्राट'. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत' या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले.
(मृत्यू: १ जून १९९८)
१९१४
ज्योति बसू – प. बंगालचे ७ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २१ जून १९७७ ते २८ ऑक्टोबर २०००), भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे [CPI(M)] सहसंस्थापक व पॉलिट ब्यूरो सदस्य
(मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
१८३९
जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक
(मृत्यू: २३ मे १९३७)
१७८९
ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी
(मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना 'न्यूस्टाड्ट' या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८).
(जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००३
प्रा. हरी श्रीधर शेणोलीकर – मध्ययुगीन मराठी वाङ्‌मयाचे व संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक अभ्यासक. त्यांचे नामदेव गाथा (संपादित), नाम्याची अमृतवाणी, प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व, मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञाकोश इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(जन्म: २२ जानेवारी १९२० - जमखंडी, कर्नाटक)
२००१
तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन
(जन्म: ? ? ????)
१९९४
डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व 'गोवा पुराभिलेख'चे संचालक
(जन्म: ? ? ????)
१९९४
किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९८४
कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ 'बाकीबाब' – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार
(जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
१९६७
विवियन ली
लिओ टॉलस्टॉयच्या कादंबरीवर आधारित ॲना कॅरेनिना (१९४८) या चित्रपटात
विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री
(जन्म: ५ नोव्हेंबर १९१३ - दार्जिलिंग, पश्चिम बंगाल )
१८३७
विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१६९५
क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध
(जन्म: १४ एप्रिल १६२९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.07.2023-शनिवार.
=========================================