आऊ

Started by mkapale, July 10, 2023, 01:33:28 PM

Previous topic - Next topic

mkapale

कुठे गेलीस तू ग आऊ
दूर..मला न सांगता
दिसतेय का डोळ्यात माझ्या
आतुरता..तुला न सांगता

पाहतो लोक येता जातांना
आहे तुज्याच चाहुलीकडे लक्ष्य
गोष्टी, खेळ आहेत रंगबिरंगी किती
पण तू एकच माझं इंद्रधनुष्य

तू आलीस कि रागावणार
नाही आले जरी बोलता
रडत मागणार तुला जाब
तुझं काहीही न ऐकता

रोज असतेस २४ तास
माझ्याच सोबत तरीही
ह्या जगातलं तू माझं जग
वाट बघणं देतंय हि ग्वाही