सांगता येत नाही

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 12, 2023, 01:38:16 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*सांगता येत नाही*

तुझ्या नी माझ्यात किती दुरावे सांगता येत नाही
घाव काळजावर किती पोसावे सांगता येत नाही

आज काळजाच्या तळाशी निखारे असतील प्रेमाचे
दुःखी या काळजाने किती सोसावे सांगता येत नाही

आता निवांत हवा तसा कोपरा मिळणे अवघड आहे
तिथे हक्क तुझे ही किती दिसावे सांगता येत नाही

व्यक्त करण्या भाव मनाचे लिहल्या कविता अनेक
कुठे शब्द गुंतलेलं किती लिहावे सांगता येत नाही

अजून गोडवा शोधत असतो त्या वळणावर मी एकटा
जिथे तुझ्या असण्याचे किती पुरावे सांगता येत नाही

स्वप्नं विखरून गेले आहे सारे तुझ्यासोबत रंगवलेले
अजून शून्यामध्ये किती स्वप्नं बघावे सांगता येत नाही

मरणाने बोलावले त्या रस्त्याने कदाचित नजरचुकीने
माझ्या तिरडीला आले किती विसावे सांगता येत नाही

कविराज...अमोल.....

मो.७८२८८९५५५५..अहमदनगर