न बोलता

Started by शिवाजी सांगळे, July 14, 2023, 08:41:02 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

न बोलता

बोलायचं ते न बोलता
सहज दरवळासम उमजावं

ह्रदयातील भावनांना
डोळ्यांनी नकळत सांगावं

गोडवा मूक भाषेचा
जसं वाऱ्याने हळू स्पर्शावं

बोलायचं ते न बोलता
मनाचं मना का न उमजावं

गूढ उबदार चाहूलीचं
कोणास का कुणी सांगावं

क्षणभर मिटून डोळे
परस्परांनी सहज जाणावं

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९