सदरा

Started by mkapale, July 19, 2023, 01:01:35 PM

Previous topic - Next topic

mkapale

जीवनात घातलेले सदरे
वाटचाल दर्शवतात आपली
शाळेतल्या समान सदऱ्याने
सर्व सारखे ही कल्पना मांडली

मोठे होता बदलत्या काळात मात्र
सदर्यांवर शोभेची आवरणे आली
आपण आवरणेच आहोत वाटले कधी
आवरण काढता सदर्यावर नजर पडली

सदरा तोच होता लहानपणीचा साधा
आवरणाने फक्त दिशाभूल घडली
आजूबाजूलाही सदरेच आहेत मग का
त्याच्या साधेपणाची सवय आता सुटली

आवरणे तात्पुरती अन सदरे कायमचे
संस्कार हे शाळा नेहेमी द्यायची
परिक्षेतील गुणांच्या गणितात राहिली
जीवनाच्या धड्यांची उजळणी घ्यायची

आवरणं बदलतील पण सदरा साधाच राहील
हे जपलं तरच माणुसकी ताजी राहील...माणुसकी ताजी राहील..