अबोल प्रेम

Started by Gyani, October 16, 2010, 08:42:37 PM

Previous topic - Next topic

Gyani

तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा बदललाय असं वाटतंय
कुणास ठाऊक पण कदाचित  तुझं माझ्यावर प्रेम जडलंय असं वाटतंय

नको पाहूस माझ्याकडे अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेडे होईल अशा तुझ्या पाहण्याने

तुला काही सांगायचे नसेल तर ते सांगू नको
पण काहीतरी बोल अशी अगदीच गप्प राहू नको

तुझ्या अशा वागण्याने मलाही वेगळाच जाणीव होत
तुझ्या डोळ्यातून मात्र तुझं अबोल प्रेम बोलून जात

डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल तर मीही अबोल राहेन
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल तर मीही अबोल राहेन
तू जरी माघार घेतलीस तरी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन
             मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन