जादूची संदूक

Started by mkapale, July 21, 2023, 09:29:55 AM

Previous topic - Next topic

mkapale

जादूची संदूक

अडगळीत कोपऱ्यात एका
सहज सापडली एक संदूक
अवाक झालो गोष्टी पाहून
उशिरा सापडल्याची होती रुख रुख

हळदीच्या दुधाचा ग्लास वाकलेला
आजीच्या चाटणाची छोटीशी पळी
हसरा चेहेरा आला नजरेसमोर
सुरकुतलेल्या गालावरची खळी

सायकलच्या चैन चा एक तुकडा
मांजाचे मळलेले छोटेसे वेटोळे
रोज आईचा ओरडा खाऊनही
बाहेर खेळतांना गणवेश तो मळे

शाळेच्या बिल्ल्यानी पाणावले डोळे
वळून दिसलेले चित्र , इयत्ता दहावीत
शाळेची इमारत,खिडकी अन ते चेहेरे
पाळंमुळं जगण्याची...खोलवर रुतलित

अडगळीतून संदूक आलीये बाहेर
लहानपण पुन्हा जगूया म्हणतोय
जुन्या गोष्टींनी चालवली जादूची छडी
आठवणींचे चलचित्र Binge Watch करतोय