रिमझिम पावसाची ओली प्रेम कविता-गीत-हा मनमोहक पावसाळा ऋतू, या पावसात मी आणि तू

Started by Atul Kaviraje, July 23, 2023, 05:26:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, रिमझिम पावसाची ओली प्रेम कविता-गीत ऐकवितो. "ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही झिमझिम वर्षणारी रविवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी )           
-----------------------------------------------------

                   "हा मनमोहक पावसाळा ऋतू, या पावसात मी आणि तू"
                  -------------------------------------------------

हा मनमोहक पावसाळा ऋतू
या पावसात मी आणि तू
या हव्याहव्याशा पर्जन्य धारा,
गार टपोऱ्या बरसत्या गारा     

हा मनभावन पावसाचा ऋतू
या पावसात मी आणि तू
ही हवीहवीशी ओलेती हवा,
तुझा भिजलेला चेहरा नित-नवा

दर्पण जणू तुझा चेहरा
त्यात शोधतोय माझा सेहरा
तुझ्या डोळ्यांत स्वप्ने पाहतोय,
त्यातील लहानश्या घरकुलात राहतोय

आता स्वप्नांना जागा कुठे
विखुरलीत ती इथे तिथे ?
या पावसाने खूप शिकवलंय,
तुझ्या डोळ्यांत मी ते पाहिलंय

हा मनोवांच्छित पावसाचा ऋतू
या पावसात मी आणि तू
ही रिमझिम बरसती बुंद,
ओढतेय तुझ्यासमीप, करीत धुंद

ऊन पावसाचा कधी लपंडाव
कधी तुझा, तर कधी माझा डाव
कधी घटI भरलेली, कधी मोकळे आकाश,
मन झेपावतंय तुजकडे तोडून पाश

वर्षाराणी मिलनाची आस देऊन
माझी इच्छा पूर्ण करतेय
माझ्या राणीच्या आगोशात मग,
माझी कहाणी संपूर्ण होतेय

हा मनासारखा जळाचा ऋतू
या पावसात मी आणि तू
ही हवीहवीशी ओलेती पायवाट,
डबक्यात साचलेली तुडवीत वाट

दरवर्षी तुझा देह भिजलेला
या पावसातही मज रिझवावा
हलकेच छत्रीत एकत्र येता,
तुझा गरम श्वास माझ्या श्वासात भिनावा

तुझ्या संमतीविना पायरी ओलांडीत
शिरशिरी तव देहाची तनूत बाळगीत
आता हाच माझा अंतिम पनIह,
आणि तुझी ती प्रेमळ निगाह

हा मनाजोगता पाऊस ऋतू
या पावसात मी आणि तू
बस फक्त झरते पाणी,
आणि फक्त मी आणि तू

अजुनी हा संकोच का ?
अजुनी हा परकेपणा का ?
हा ऋतू आपलासा करतोय,
तुला मला जवळ आणतोय

तुला मला कसा बिलगून कोसळतोय
जणू आपल्या प्रेमाचे गीत गातोय
ऐक हलकेच, तो काय सांगतोय,
तू माझी, मी तुझा म्हणतोय

हा मनस्वी पाऊस ऋतू
या पावसात मी आणि तू
झुळझुळ वाहणारा झरा गुणगुणतोय,
मी तुझा आणि माझी तू

हा क्षण इथेच विरामावा
हा प्रवास इथेच थांबावा
हा पाऊस असाच पडावा,
तुला आणि मला भिजत ठेवावा

पाऊस गाणे गात रहावा
पाऊस संगीत देत रहावा
कर्णमधुर रव तनुत भिनवत,
तुझा सहवास सदैव असावा

हा मनाजोगता वर्षत ऋतू
या पावसात मी आणि तू
तुझ्या मिठीत भान विसरत,
अन विस्मरित अन्य ऋतू

हा मनामनाचा पायस-पावन ऋतू
या पावसात मी आणि तू
आपल्या प्रेमाची ग्वाही देत,
मला आपले म्हण तू

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.07.2023-रविवार.
=========================================