उत्तर

Started by mkapale, July 24, 2023, 04:06:40 PM

Previous topic - Next topic

mkapale

उत्तर

आज पुन्हा ती मला म्हणाली देते उत्तर
थोडासा लागेल वेळ पण....देते उत्तर

उद्या बदलेल दिवस हा होईल सुंदर
आजचा काळोख जाऊदे..देते उत्तर

डोके वापरून पैसा येतो हेच ऐकले
हुशार दरिद्री कसा? कळलं कि देते उत्तर

नदीशेजारी घर टुमदार होते स्वप्नगत
गिळले का? नदीने सांगितले कि देते उत्तर

तू विचारतो आता आपले कसे होणार
मला सुटले कोडे हे कि देते उत्तर

रम्य वाहत्या पाण्याने नेले उखडून सारे
कसे वाहिले घर, लेकरा कसे देऊ उत्तर