भटक्या

Started by mkapale, July 25, 2023, 01:51:44 PM

Previous topic - Next topic

mkapale

भटक्या

राहिलो अनेक जागी
पण कुठलाच राहिलो नाही
स्थाने अनेक फिरलो
पण स्थानिक राहिलो नाही

प्रवास गुंतागुंतीचा असे तो
परी गुंतून राहिलो नाही
किती त्या घरांत होतो
एकही घरकुल राहिले नाही

सगळ्या ऋतूत टिकलो
टिकून एकात राहिलो नाही
बिर्हाड होते पाठीवर
कधी त्यात राहिलो नाही

भटके आयुष्य जगलो
भटकलेला राहिलो नाही
बदलाव हेच जीवन माझे
कधी स्थायी राहिलो नाही

कित्येक पाहिली गावे
ग्रामीण राहिलो नाही
आव्हाने पेलली सारी
गाफील राहिलो नाही

जागतिक झालो इतका
पर्यटक राहिलो नाही
गोल ते विश्व अनुभवले
चौकटीत राहिलो नाही