पाऊस प्रेमकविता-दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे,प्रीत फुलण्याचे प्रेमगीत गाण्याचे

Started by Atul Kaviraje, July 26, 2023, 11:54:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, संततधार पावसातली एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही कृष्ण-सावळया मेघांनी दाटलेली बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात )           
--------------------------------------------------------------------------

          "दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे, प्रीत फुलण्याचे प्रेम गीत गाण्याचे"
         -------------------------------------------------------------

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
प्रीत फुलण्याचे प्रेम गीत गाण्याचे
मनसोक्त भिजण्याचे तल्लीन नाचण्याचे,
मनातल्या भावना साकार करण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
प्रीत फुलण्याचे प्रेम गीत गाण्याचे
धुंद फुंद होऊन सारं सारं विसरण्याचे,
या संततधारेत सतत भिजत राहण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
मनात जपलेले प्रेम उजळ करण्याचे
प्रेम भावनांना मूर्त स्वरूप देण्याचे,
केव्हाचे, तेव्हाचे, कालचे अन आजचे 

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
मनातले गुज डोळ्यांनी बोलण्याचे
मिटलेल्या ओठांनी खूप काही सांगण्याचे,
स्पर्शाने रोमांच फुलवीत राहण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
उमलत्या प्रीतीत मुक्त विहरण्याचे
खेळकर वाऱ्यासवे लाडीगोडी करण्याचे,
धुंद फुंद शीत बूंद ओठी बाळगण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
सजणाच्या स्पर्शाने अवचित शहारण्याचे
मग निमित्त करीत चिंब भिजण्याचे,
हलकेच मिठीत झोकून देण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
तुषार जलबिंदूंचे लाडीकपणे उधळण्याचे
पागोळीचे पाणी ओंजळीतून वाहवण्याचे, 
मुखावर शीत सपकारे घेण्याचे 

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
सारे सारे नवं नवे भासण्याचे
सजणाला मनापासून साद घालण्याचे, 
प्रीतफुलाला ओंजळीत घेऊन कुरवाळण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
साजणीची मादक अंगडाई पाहण्याचे
केसांवरले ओघळते पाणी स्पर्शण्याचे,
तिच्या मुक्त बटामंध्ये गुंतून राहण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
तन आणि मन एक होण्याचे
त्याच धुंदीत मदहोश होण्याचे,
भान विसरण्याचे, बेभान होण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
तिचा तनु मधुगंध श्वासात भरण्याचे
गंधित होऊन नशा-बंधित होण्याचे,
श्वासाश्वासांची एकतार, एकलय जुळण्याचे 

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
तिला हलकेच मिठीत घेण्याचे
तिच्या हृदयातील धडधड ऐकण्याचे,
तिच्या मनाचा ठाव घेण्याचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे
दिवस पावसाचे हव्याहव्याशा ऋतूचे
बहरलेले, मोहरलेले फुलोरा फुलण्याचे,
उत्साहाचे, उधाणाचे, उल्हासाचे, उमंगाचे

दिवस पावसाचे बरसत्या जलधारांचे,
प्रीत फुलण्याचे प्रेम गीत गाण्याचे
तिच्या डोळ्यात पाहून कानी कुजबुजण्याचे,
तिला "I LOVE YOU" म्हणण्याचे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.07.2023-बुधवार.
=========================================