परिपूर्ण

Started by mkapale, July 27, 2023, 10:16:02 AM

Previous topic - Next topic

mkapale

परिपूर्ण

विचारले इतरांना पण सगळेच होते व्यस्त
रेंगाळणाऱ्या आयुष्याने झालो होतो अस्वस्थ

आवरले मन आणि बॅग, उराशी घेतला विश्वास
निघालो प्रवासाला एकटा, घ्यायला मोकळा श्वास

काही गोष्टी समजून केल्या काही सोडल्या वेळेवर
वेड्यासारखं निर्भय वागू थोडं बिंबवलं मनावर

हिरवागार गालिचा पाहिला उंच पर्वतावरून
खेळ बालिश ऊन सावलीचे मन हसले पाहून

समुद्राची लाट वाळूत स्थिरणारे पाय खेचत होती
भावनांच्या संतुलनाचे नकळत मूल्य सांगत होती

अपरिचित ठिकाणे अचानक आपली वाटू लागली
भय विरले अन मला स्वतःची ओळख होऊ लागली

नक्की सांगतो चाकोरीबाहेर, निसर्गाशी गप्पा मारायला जा
बिनधास्त एकटे कधी स्वतःमध्ये स्वतःला हुडकायला जा