संततधार पावसातली एक प्रेम कविता-गीत-तुझे माझे पहिले प्रेम, वाहिले मी तुला सप्रेम

Started by Atul Kaviraje, July 27, 2023, 10:59:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, संततधार पावसातली एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही संथ संततधारेत बरसणारी गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल )           
---------------------------------------------------------------------

                       "तुझे माझे पहिले प्रेम, वाहिले मी तुला सप्रेम"
                      ---------------------------------------

तुझे माझे पहिले प्रेम,
वाहिले मी तुला सप्रेम
या पावसालाच साक्षी ठेवून,
सुरु झाला आपल्या प्रेमाचा गेम

तुझे माझे पहिले प्रेम,
वाहिले मी तुला सप्रेम
पाऊसच होता याला कारणीभूत,
त्यानेच ठरवले होते आपले क्षेम

प्रेम झाले, होकारही आला
पावसाच्या साक्षीने मंडपही सजला
चल भविष्याची स्वप्ने पाहू,
भटजींनी मधोमध अंतरपाटही धरला

मग आता का मनी भीती ?
साऱ्यांना ठाऊक आहे आपली प्रीती
मंजिल आपण शोधून काढू,
साऱ्या समाजाशी आपण लढू

या पावसालाच ठेवून साक्षी
आपण केले होते प्रेम
आता त्यालाच ठेवून साक्षी,
मी तुला वाहतो सप्रेम

सांग तुझ्यासाठी मी काय करू ?
तुझी मांग ताऱ्यांनी सवारू
चंद्र सूर्याचे उजळते दीप,
तुझ्या वाटेकडे मी धरू

तुझे माझे पहिले प्रेम
कोणाचेच नसेल प्रिये सेम
चल आता नको उशीर अधिक,
या समाजाचा काही नाही नेम

तुझे माझे पहिले प्रेम
चिरकाल टिकणारे आपले प्रेम
आपल्या प्रेमाला दृष्ट न लागो,
जणू सुवर्ण, कांचन, झळाळते हेम

तुझे माझे पहिले प्रेम
वाहिले मी तुला सप्रेम
स्वीकार कर माझ्या प्रेमाचा,
माझे अतूट, अभंग, अक्षय प्रेम

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.07.2023-गुरुवार.
=========================================