छान पावसाची प्रेम कविता-तुझ्या हास्याने जादूच केलीय, बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय

Started by Atul Kaviraje, July 28, 2023, 01:10:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, छान पावसाची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "कोई लड़की है, जब वो हँसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही थोडीशी मळभ असलेली, थोडीशी शिडकावा करणारी शुक्रवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( कोई लड़की है, जब वो हँसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम )           
--------------------------------------------------------------------------

              "तुझ्या हास्याने जादूच केलीय, बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय"
             --------------------------------------------------------

तुझ्या हास्याने जादूच केलीय
बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय
तुझ्या नजरेने कमालच केलीय,
पावसाची साऱ्यांवरच मेहेरनजर झालीय

तुझ्या हास्याने जादूच केलीय
बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय
तू हसलीस की पाऊस येणारच,
तुझी आणि पावसाची मैत्रीचं झालीय 

तुला पाहून ढग खाली झुकलेत
तू दिसता जळानी ते भरलेत
तू जाशील तिथे ते वर्षलेत,
तुझ्यावर त्यांनी अमृत-कुंभ बरसवलेत

हा जल ऋतू तुझ्यासाठीच फुललाय
हा पाणी मोसम तुझ्याकरिता बहरलाय
पाहून तुझे हास्य तोही हसलाय,
तुझ्या वाटेवर जल-बिंदूचा गालिचा अंथरलाय

तुफानाची तुझ्यापुढे काय बिशाद
तुझ्या अदेपुढे तेही शमलेय
आपल्या वावटळीना कवेत घेत,
संथ संततधारेत तुझ्यापुढे झुकलेय

या पावसाचा इशारा तुलाच कळलाय
त्याचा सूर फक्त तुलाच गवसलाय
या ऋतूला फक्त तूच काबूत ठेवलेस,
निसर्गही हे पाहून अचंबित झालाय

हा अनंत आसमंत तुला पाहत आहे
हे अंबर तुझ्यासमोर लीन होत आहे
सर्व काही थांबल्यासारखे स्थिर आहे,
फक्त तुझाच पदन्यास सर्वत्र होत आहे

या पावसाची तू ऋतुराणीच आहेस
तुझी अलग अशी कहाणीच आहे
निसर्गासही वश करणारी तू
अतिशय सूज्ञ शहाणीच आहेस

तुझ्या हास्याने जादूच केलीय
बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय
आज पाऊस तुझ्यासाठीच पडत आहे,
हे तुषार तुझ्याभोवतीच उडत आहेत

तुझ्या हास्याने जादूच केलीय
बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय
तू फक्त हसत रहा, खूष रहा,
नदी-नाल्याना तुडुंब भरती आलीय

तुझ्या हास्याने जादूच केलीय
बरसत अमृतधारा धर्तीवर आलीय
माझ्या प्रियेचा मला अभिमान आहे,
तिची प्रीत आज मला मिळालीय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.07.2023-शुक्रवार.
=========================================