चिंब पावसातली प्रेम कविता-गीत-हे दवबिंदू या जलधारा, प्रेम कर सांगतोय उनाड वारा

Started by Atul Kaviraje, July 29, 2023, 11:41:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, चिंब चिंब पावसातली एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही थोडीशी ढगाळलेली, थोडीशी प्रकाशलेली शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा )           
----------------------------------------------------

                  "हे दवबिंदू या जलधारा, प्रेम कर सांगतोय उनाड वारा"
                 ------------------------------------------------

हे दंवबिंदू या जलधारा
प्रेम कर सांगतोय उनाड वारा
अदा तुझी मोहीत करतेय मज,
अन तुझा हा खरा नखरा

हे दवबिंदू या जलधारा
प्रेम कर सांगतोय उनाड वारा
नजरेत तुझ्या भरलाय माझ्यासाठी,
काठोकाठ उतणारI प्रेम झरा

हा चिंब चिंब निसर्ग सांगतोय
हा भिजलेला मोसम सांगतोय
हा ऋतूच आहे प्रेमात पडण्याचा,
हा ऋतूच आहे प्रीत फुलण्याचा

आज मी नशेतच आहे जणू
पाहून तुला हेलकावे खातंय सुकाणू
बस तुझ्या एका नजरेनेच,
घायाळ दिल लागलंय काही म्हणू

माझा तोल जाण्याचाच बाकी आहे
जेव्हापासून तुझ्या डोळ्यात प्रेम पाहिलंय
या माझ्या बेभान, धुंद अवस्थेला,
तुझं कातिल पहाणच साक्षी राहिलंय

माझ्या असण्यावर तू जाऊ नकोस
माझ्या गरिबीवर तू हसू नकोस
प्रेम श्रीमंती गरिबी पाहत नाही,
बघ, हृदयात भरलाय प्रेम-खजिना भरघोस   

असेल माझी हस्ती लहान
तुझ्यावर प्रेम करतोय मी दिलोजान
नसेल माझी काहीच शान,
तुझ्या प्रेमाचा ठेवतोय मी मान

हा पाऊसही पहा राजी आहे
आपल्या प्रेमाला त्याची रजIमंदी आहे
आता तू तुझी इतराजी सोड,
माझ्या प्रेमाला तुझा होकार आहे ?

हे दंवबिंदू या जलधारा,
प्रेम कर सांगतोय उनाड वारा
आपले प्रेम आहेच तसे प्रिये,
जणू झुळूझुळू वाहणारा झरा   

हे दंवबिंदू या जलधारा,
प्रेम कर सांगतोय उनाड वारा
आपले हे गुपित आता नाहीय गुपित,
प्रेम-गंध पसरवीत नेतोय वारा सारा

हे दंवबिंदू या जलधारा,
प्रेम कर सांगतोय उनाड वारा
हा पाऊस तुला मला एक करतोय,
एक तोच प्रेमी जनांचा मित्र खरा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.07.2023-शनिवार.
=========================================