२९-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 29, 2023, 05:04:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०७.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२९-जुलै-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
२९ जुलै
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
१९८७
भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
१९८५
मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार
१९५७
'इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA)'ची स्थापना झाली.
१९४८
दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९४६
टाटा एअरलाइन्सचे 'एअर इंडिया' असे नामकरण करण्यात आले.
१९२०
जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.
१८७६
फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेची स्थापना केली.
१८५२
पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८१
फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश रेस कार ड्रायव्हर
१९५९
संजय दत्त – अभिनेता व गुन्हेगार
१९५३
अनुप जलोटा – भजनगायक
१९२५
शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार
१९२२
बळवंत मोरेश्वर तथा ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर
१९०४
जहांगीर रतनजी दादाभॉय तथा 'जे. आर. डी.' टाटा – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
१८८३
बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा
(मृत्यू: २८ एप्रिल १९४५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००९
महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता
(जन्म: २३ मे १९१९)
२००६
डॉ. निर्मलकुमार फडकुले –  मराठी संत साहित्यातील विद्वान
>(जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)
२००३
बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ 'जॉनी वॉकर' – विनोदी अभिनेता
(जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००२
सुधीर फडके ऊर्फ 'बाबूजी' – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९)
१९९६
अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(जन्म: १६ जुलै १९०९)
१८९१
ईश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.
(जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
१८९०
व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार
(जन्म: ३० मार्च १८५३)
१७८१
योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: १४ सप्टेंबर १७१३)
११०८
फिलिप (पहिला) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २३ मे १०५२)
२३८
बाल्बिनस – रोमन सम्राट
(जन्म: १६५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.07.2023-शनिवार.
=========================================