दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

Started by Atul Kaviraje, July 29, 2023, 05:06:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                                "आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन"
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-29.07.2023-शनिवार आहे. २९ जुलै-हा दिवस "आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आज "आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन". जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै जागतिक व्याघ्र दिन घोषित करण्यात आला.

     29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस-इंटरनॅशनल टायगर डे म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. वाघोबांचे जंगलातील अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, या हेतूनेदरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

             वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी--

     भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो.

             वाघाचे माहेरघर भारत--

वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते.

जगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात.

जगातील एकूण वाघांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे जगभरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संरक्षकांची आशा भारतावरच टिकून आहे. कोणत्याही अभयारण्यात फिरायला गेल्यानंतर साधारणपणे पहिले आकर्षण हे वाघ दिसण्याचे असते.

                वाघाचं अस्तित्व--

     गेल्या शंभर वर्षात आपण पृथ्वीवर असलेल्या वाघांपैकी ९७ टक्के वाघांचा बळी घेतला आहे आणि आज जेमतेम ४,००० वाघ भारतात शिल्लक राहीले आहेत. याला दुर्दैवच म्हणावं. हा वेग असाच कायम राहिला तर आणखी पाच वर्षात मार्जार जातीचा हा देखणा प्राणी पूर्णपणे नामशेष होईल.

               शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा--

     रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २०१० साली झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा गेली गेली. मानवाने केलेली अमर्याद जंगलतोड आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे वाघांची ९३ टक्के नैसर्गिक निवासस्थाने नष्ट झालीत. काही ठिकाणी वाघ उरले असले तरी हे क्षेत्र खूपच मर्यादित आहे आणि त्यामुळे वाघ सहजपणे शिकाऱ्यांचा निशाना ठरतात. अन्न्साखळीतील महत्वाचा घटक असलेल्या वाघ आणि मानव यांच्यात जागेसाठी संघर्ष सुरु आहे परिणामी बऱ्याच ठिकाणी वाघ मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे सगळे असेच सुरु राहील्यास सुंदरबन सारखे वाघांचे नंदनवन पूर्णपणे नष्ट होईल. या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन करण्यात येते.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जय महाराष्ट्र न्यूज.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.07.2023-शनिवार.
=========================================