गिफ्ट

Started by prachidesai, October 20, 2010, 12:42:19 PM

Previous topic - Next topic

prachidesai

गिफ्ट
" Happy Birthday " हळूच म्हणेन
मी तुझ्या कानात जेव्हा
झोपेत हसून आळस देशील
कुशीत येशील अलगद तेव्हा

मी म्हणेन ... चल आटप लवकर
नकोच घेउस आळोखे पिळोखे
दिवस कसा बघ उजाडलाय खास
आज तुझा वाढदिवस सखे

तू म्हणशील ... नको जाउस सोडून
इथेच करू हा दिवस साजरा
नकोत कसले सेलिब्रेशन, पार्ट्या
आज फक्त माझा तू हो न जरा
.
.
.
विरघळतोय बहुतेक हळूच मी आता
काळीज चिरतेय ही मधाळ भाषा
भान ना कसले तूच तू आता
सकाळच्या प्रहरी ही रात्रीची नशा

सारे कसे आता धुंद धुंद
नजरेत तुझ्या हा प्रणयही मंद
श्वासात माझ्या श्वास तुझा बेधुंद
तुझ्या तनुचा असा हवाहवासा गंध

वाढदिवस तर तुझा उद्या आहे ना !
मी बोलता हसून तू हळूच लाजली
गुंतली पहाट मग मिठीत तुझ्या
उजाडले तरी कशी रात्र ना सरली

क्षण दोघांचे आता दोघांनीच जगायचे
सेलिब्रेशन असे अजून असते काय
मी आहे आज फक्त तुझ्याचसाठी
गिफ्ट म्हणून तुला अजून देऊ तरी काय

... रुपेश सावंत

NilamT


santoshi.world

kai mast line ahet hya ......... chhan ahe kavita :)

तू म्हणशील ... नको जाउस सोडून
इथेच करू हा दिवस साजरा
नकोत कसले सेलिब्रेशन, पार्ट्या
आज फक्त माझा तू हो न जरा
.

विरघळतोय बहुतेक हळूच मी आता
काळीज चिरतेय ही मधाळ भाषा
भान ना कसले तूच तू आता
सकाळच्या प्रहरी ही रात्रीची नशा

sheetal.pawar29

गिफ्ट
" Happy Birthday " हळूच म्हणेन
मी तुझ्या कानात जेव्हा
झोपेत हसून आळस देशील
कुशीत येशील अलगद तेव्हा

क्षण दोघांचे आता दोघांनीच जगायचे
सेलिब्रेशन असे अजून असते काय
मी आहे आज फक्त तुझ्याचसाठी
गिफ्ट म्हणून तुला अजून देऊ तरी काय

maza navra mala asacha gift deto...
tyachya mithit...ch maz celebration asat....

rudra

so nice thanx................

PRASAD NADKARNI


nitin1123

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास


न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास

सागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर?

आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास


मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस

तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?

आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु

सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?


एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप

आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप

अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस

आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज


तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो

आणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो

घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं

हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.


आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी

तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी

सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा

तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?


सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी



Lucky Sir

#8
chhan ahe