पावसातली एक अनोखी कविता-गीत-रिम झिम पडती पाऊसधारा, अंगी चेतवुनी दाहक अंगारा

Started by Atul Kaviraje, July 30, 2023, 10:59:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक अनोखी कविता-गीत ऐकवितो. "रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन-गायिका-लता मंगेशकर"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही बऱ्याच दिवसानंतर सूर्यदेवास आसमंतात दाखविणारी, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(रिम-झिम गिरे सावन,सुलग सुलग जाए मन-गायिका-लता मंगेशकर)           
--------------------------------------------------------------------------

                 "रिम झिम पडती पाऊसधारा, अंगी चेतवुनी दाहक अंगारा"
                ---------------------------------------------------

रिम झिम पडती पाऊसधारा
अंगी चेतवुनी दाहक अंगारा
ओला ऋतू हा पेटवून जाई,
तप्त ज्वाळा साऱ्या शरीरा

रिम झिम पडती पाऊसधारा
अंगी चेतवुनी दाहक अंगारा
हा पाऊस आहे की वन्ही ?,
की अग्नीचा झंझावती कोसळता मारा

आधीही ढग असेच झरायचे
आधीही घटा अशीच उमडायची
आधीही गालावरती रुळणारी बटा,
या अवखळ वाऱ्याने अशीच उडायची   

आधीही मोसम असाच बरसायचा
शिवरीत गारवा असाच कोसळायचा
आधीही हा पाऊस खेळकर पवनIसवे,
चिंब पदराला लहरत उडवायचा

आतास हे काय होतंय साजणा ?
का इतका भिजवतोय तो अंगणI ?
शीतलता या मनाची भंग करून,
दग्ध करणारा याचा बाणा ?

हे आधी नव्हतं घडतं प्रियकरा
सुसह्य होत्या त्या पावसाच्या गारा
मग आताच का सुलगत चाललंय मन ?,
या असह्य ज्वाळांनी दहकत चाललंय तन !

तेव्हा वर्षाराणी गायची गाणी
चिंब ओले बरसवIयची पाणी
तेव्हाचा पाऊस हवाहवासा होता,
तेव्हाचा पावसाळा आपलासा होता

आतुरतेने वाट पाहायची मी त्याची
घट्ट मैत्री होती माझी अन त्याची
तो जणू माझ्यासाठीच बरसायचा,
मनाच्या कप्प्यात तो माझ्या दडायचा

आता पावसाचे इतके उग्र रूप का ?
आता त्याचे असे रुद्र स्वरूप का ?
का तो इतका वणव्यापरी पसरतोय ?,
का तो इतका तन-मन शिलगवतोय ?

हा शीतल ऋतू इतका पोळतोय का ?
हा पाऊस मनास जाळतोय का ?
मनाचा ठाव घेणारा हा मनकवडा,
मनास दाहक घाव देतोय का ?

हा चंचल वाराही त्याला साथ देतोय
जणू पवन पिऊन कसा झोकांडी देतोय
सर्व शरीरभर मदहोशी पसरवणारा तो,
आज शरीरभर आगीच्या ज्वाळा पसरवतोय

रिम झिम पडती पाऊसधारा
अंगी चेतवुनी दाहक अंगारा
आज पावसाचे वेगळेच रूप पाहतेय,
आज वेगळ्याच वर्षताहेत जल-धारा

रिम झिम पडती पाऊसधारा
अंगी चेतवुनी दाहक अंगारा
मन माझे आहे अजुनी अचंबित,
का फुलतोय साऱ्या शरीरी निखारा ?

रिम झिम पडती पाऊसधारा
अंगी चेतवुनी दाहक अंगारा
याच्या मनी आहे तरी काय ?,
सुलगवून, शिलगवून जाई साऱ्या शरीरा !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.07.2023-रविवार.
=========================================