पिकनिक

Started by mkapale, July 31, 2023, 09:00:46 AM

Previous topic - Next topic

mkapale

पिकनिक

दिवस आणि ठिकाण ठरलं कि
इच्छूक आणि इतर चाळणी होते
कोणी मिठाचा तर कोणी साखरेचा
खडा सारखा उत्सहात टाकत असते

अश्यात तो दिवस येतो....

येणारे आपले मार्गे ठरवतात
निघणं आदल्या किंवा दिवशी होते
आनंदी चेहेरे एकमेकांना दाखवत
घर ठेऊन मागे उत्स्फूर्त आगमन होते

अश्यात ते पाणी खुणावू लागते....

एक पाय टाकून अंदाज घेत
तर काहींची उड्या मारून सुरुवात होते
शेवटी उतरतात सगळेच पाण्यात
भीतीचा भागाकार अन मजेची दुप्पट होते

अश्यात Reels ची आठवण येते...

काही शिक्षक तर काही शिकत असता
कोणी तालात तर कोणी धुंदीत नाचते
केलेला नाच करतांना नाही कळला
तरी बघतांना मनोरंजन साऱ्यांचे होते

अश्यात कोणी खेळ येतो घेऊन...

तळ्यात मळ्यात पाय चिखलात
शरीर जणू १० वर्षांचे होऊन जाते
कोण बाद आणि कोण जिंकतोय
त्यापेक्षा खेळात गुंतल्याने छान वाटते

अश्यात मग सडकून भूक लागते...

शाकाहारी , एकादशी आणि इतर
जातकुळ्या ठरवून विभाजन होते
टोमणे मारत गप्पा मारत जेवतांना
कोपरखळ्यांनी लज्जत वाढतच जाते

अश्यात शतपावली करावे म्हणतो कोणी...

काही घेऊन छत्री तर काही असेच निघतात
गाववाटेवर सांभाळत चालायची संधी मिळते
ओढा असतो वाहत्या पाण्याचा ...बोलवतो
एकमेकांना हात देता वाहते पाणी पार होते

अश्यात नेमका कोसळतो तो पाऊस...

आनंदाच्या धारा बरसू लागतात चोहीकडे
नैसर्गिक showar मधे तनमन तृप्त होते
कसे बरे एकामागे एक क्षण येत आहेत
आठवणींचे संचित वाढतांना अप्रूपहि वाटते

मग येते ती परत जाण्याची वेळ....

कसे गेले २४ तास कळतच नाही
हिरवळ सुरेख, साथ मित्रांची नशेगत वाटते
पुन्हा कधी भेटायचे चर्चा होते परततांना
जगलेले क्षण अन आनंदाची गठडी सोबत जाते

- मिलिंद कपाळे ३१ जुलै २०२३