पाऊस

Started by mkapale, July 31, 2023, 02:56:50 PM

Previous topic - Next topic

mkapale

पाऊस

पाऊस हा सर्वांचे सर्वच जाणतो
अंगाला शिवला कि रोमांच आणतो

हृदयातले सगळे भाव बाहेर काढतो
आपल्याला आपली नवी ओळख करवतो

आपल्यातले बालपण जागं करतो
वयाची विसर पडून आपण त्यात नाहतो

भावनांना मनातल्या स्पर्श तो करतो
आनंदाला वा दुख्खाला पाझर फोडतो

तापलेल्या धरतीला अन मनाला शांत करतो
परिस्तिथीचा संताप तो सुगंधाने शमवतो

धरणीला हिरवा साज नेसवतो
नद्यांचे पात्र भरवून तहान भागवतो

मातीला आणि मनाला कोमल करतो
बीज अन कवितांचे अंकुर फुलवतो