वास्तव कविता-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम

Started by Atul Kaviraje, July 31, 2023, 03:21:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     लग्न हा एक संस्कार आहे. काही क्वचित कारणे सोडता, हा संस्कार प्रत्येकाच्याच नशिबी असतो. परंपरागत चालून येत असलेल्या काही रिवाजांना, परंपरांना आता मोडता घालण्याची वेळ आली आहे. कसं ते आपण या माझ्या पुढील व्यंगात्मक, काहीशी विनोदी, पण आजच्या सत्य, वास्तव लघु-कवितेतून वाचूया. या कवितेचे शीर्षक आहे- "मुलगी पाहण्याचा कार्यक्रम"

                "मुलगी पाहण्याचा कार्यक्रम"
               -------------------------

मुलगी झाली, धन-लक्षूमी आली
मुलगी शिकली, नावा रूपा आली

आजही ऊत खेडयामंध्ये बुरसटलेल्या विचारांना
मुलगी झाल्यावर कमी लेखताना

इथे शहरातही विचारांची कमी नाही
मुलांचा आजही मुलींपेक्षा वरचष्मा राही

वयात येता, लग्नाची जबाबदारी
आई वडिलांच्या फेऱ्या दारोदारी

पसंती, नापसंती फक्त मुलांकडचीच ?
मुलीला सोय नाही विचारायचीच

मुलगा चालेल मग कमी शिकलेला
मुलगी सरावतेय हळू हळू ऍडजस्टमेंटला

तिनेच घेतलाय का मक्ता ऍडजस्टमेंटचा ?
मुरड घालून मनाला एकत्र राहण्याचा

सर्वात वरताण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम
मुलांचा का नाही लागत यात क्रम ?

मुलाकडे का नाही होत कार्यक्रम कांद्या-पोह्यांचा ?
अन मुलांच्या सुगम-संगीत गाण्यांचा

मुलीला नाही अधिकार मुलाला प्रश्न विचारण्याचा ?
सरतेशेवटी पसंतीचा आणि नापसंतीचा

हे असंच होत आलंय आजवर
लग्नापुर्वीच्या पसंतीचा वधू आणि वर

समाजाने थोडे समजायला हवे
रूढी परंपरांना बदलायला हवे

मुलांना स्वातंत्र्य तसं मुलींनाही
मुलगी काही मुलापेक्षा कमी नाही

इतकंही नाही की ती सैल सुटावीत
लग्नापूर्वीच आपली रिलेशनशिप बांधावीत

मनाजोगती प्रेम प्रकरणे करीत राहावीत
ब्रेक अप आणि पॅच अप करीत सुटावीत

कसंही करावं, संमतीने लग्न व्हावं
कांद्या-पोह्यांच त्याला बंधन नसावं

शेवटी लग्न म्हणजे दोन जिवांचं जुळणं 
लग्न म्हणजे दोन घरांचं मिळणं 

तेव्हा मित्र-मैत्रिणींनो विचार करा
एकमेकांची मते जुळण्याचा विचार खरा

ऍडजस्टमेन्ट आहेच, करावीच लागते
दोघांना एकत्र नांदावेच लागते

कांद्या-पोह्यांच्या कार्यक्रमाला स्थगिती द्या
एकमेकांच्या संमतीने लग्नाला होकार द्या

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2023-सोमवार. 
=========================================