थेंब

Started by mkapale, July 31, 2023, 05:34:02 PM

Previous topic - Next topic

mkapale

थेंब

काळे ढग आणि विजा घाबरवतात
पहिल्या दशकात थेंब चकित करतात

येतो पाऊस घेऊन प्रणय अन प्रेम
दुसऱ्या दशकात थेंब आग लावतात

शहरवासी त्रस्त तुंबलेल्या पाण्याने होतात
खुश होतो शेतकरी ओढे दुथडी वाहतात
आईला काळजी आजार जेव्हा येतात
तिसऱ्या दशकात थेंब विविधभाव आणतात

मुले येतात उड्या मारून मस्त पावसात
मोठे कांदाभजी चहाची फर्माईश करतात
चाकरमाने दांडी मारून रमीचा डाव मांडतात
चौथ्या पाचव्या दशकात थेंब दृष्टिकोण बदलवतात

नाविन्य जातं , खूप पावसाळे पाहिलेले असतात
काढे पीत, गोळ्या खात घाबरत जगतात
चष्मा, काठी, पिशव्या सोबतीला असतात
साठीनंतर थेंब फक्त ऋतू बनून राहतात

पावसाचं काय करायचं जे ते ठरवतात
वय फक्त संख्या असेल तर थेंब नेहेमीच सुखावतात