गुलाब

Started by mkapale, August 01, 2023, 10:18:11 AM

Previous topic - Next topic

mkapale

गुलाब

करावे कधी तिचे लाड शब्दातून
तिचा चेहेरा पाहावा चंद्राशी तोलून
हसतांना तिला म्हणावे पौर्णिमा पाहिली
वाटावे तिला आपण परी आहोत म्हणून

फुलागत नाजूक म्हटले तिला कि
तिनेही लाजाळूचे झाड व्हावे पटकन
तिची ती तिरकी नजर असते आपल्याकडे
आपणही मग एक डोळा मारावा झटकन

गोडवा नजरानजरेतून मधासारखा ओघळावा
कोणी दुसरे पाहते का तेही चाचपावे
न बोलता इशाऱ्याने गझल म्हणतांना तिच्यावर
तिने हलकेच ते गुलाबी ओठ चावावे

ती गुलाब अन मी छेडणारा द्वाड भुंगा
नजरेतून प्रेमाचा मधुरस पीत जावे
नजर टेकली तिच्यावर कि तिनेही पाहावे
असेच दुरून मोहाचे संकेत द्यावे घ्यावे