परी

Started by mkapale, August 01, 2023, 11:16:34 AM

Previous topic - Next topic

mkapale

परी

मिळते का हो शोधून कुठे परी
तिला बनवायला राणी मी तयारआहे
जुळतात धागे जन्मताच दोघांचे म्हणे
कधीची मी तिची वाट पाहतो आहे

डोळ्यात माझ्या खंतेची झाक असली
प्रेमाचा झरा मात्र काठोकाठ भरून आहे
तिने यावे अन म्हणावे साथ देशील का
जोडीदार सावलीगत तिचा राहणार आहे

जगणे जे घडून गेले ते पुढे जगणे नको
रात्रीच्या पल्याड किरणांची अपेक्षा आहे
आहेस तू कुठे वाट पाहत थांबलेली
ये आता..दुनियेत आपुल्या पहाट आहे