फुलपाखरू

Started by mkapale, August 02, 2023, 10:27:11 AM

Previous topic - Next topic

mkapale

फुलपाखरू

कळीचे फुल होतांना पाहते आहे
तुला मोठी होतांना पाहते आहे

अजूनही पाय उड्या घेतात तुझे
ते थोडे खंबीर होतांना पाहते आहे

कुशीत तू येतेस झोपायला अजूनही
बिनधास्त एकटे झोपणेही वाढत आहे

तुला जपले रेशमी कोशात आजवर
फुलपाखरासारखे तुला पुढे उडायचे आहे

कारंज्याच्या तुषारागत विचार तुझे
जलधारेगत एका दिशेत आणायचे आहे

वाटाड्या आहेच तुझी जन्मभर मी
ओझे तुझे,  तुलाच उचलायचे आहे