पावसाच्या वृष्टीतील प्रेमगीत-या पावसात हे काय घडलंय?,मन माझं,माझं नाही राहिलंय !

Started by Atul Kaviraje, August 02, 2023, 11:01:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाच्या मंद वृष्टीतील एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "जो हाल दिल का इधर हो रहा है, वो हाल दिल का उधर हो रहा है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस थांबलेली, विरळ कृष्ण अभ्र असलेली उदास अशी बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(जो हाल दिल का इधर हो रहा है, वो हाल दिल का उधर हो रहा है )           
--------------------------------------------------------------------------

                "या पावसात हे काय घडलंय ?, मन माझं, माझं नाही राहिलंय !"
               --------------------------------------------------------

या पावसात हे काय घडलंय ?
मन माझं, माझं नाही राहिलंय !
या जलधारात असं काय दडलंय ?,
पडता पडता त्यांनी प्रेमातच पाडलंय

या पावसात हे काय घडलंय ?
मन माझं माझं नाही राहिलंय !
तुलाही तिथे हाच अनुभव येतोय का ?,
तुझं मन तुझ्याही काबूत नाही राहिलंय

धारा सरसरत पहा कश्या धावताहेत
तुला अन मला त्या जणू बोलवताहेत
कोण नाही प्रेमात पडणार हे पाहून,
तुला मला त्या प्रेम-पाशात अडकवताहेत

एक अजब खुमारी अंगी दाटून राहिलीय
एक अनोखी नशा शरीरी लगटून राहिलीय
काहीतरी वेगळं असं घडू पहातंय,
तुला अन मला मनाने जोडू पहातंय

अवचित मन तुझ्याभोवती पिंगा घालतंय
तुला आलिंगनात ते जखडू पहातंय
ओठावर तुझं गीत आपसूक रुळतंय,
माझ्या ओठांनी ते तुझ्या गाली सजतंय

तुझी कहाणी आता माझी कहाणी आहे
त्या गोष्टीतली तू माझी परी राणी आहे
तुझा राजकुमार व्हायचे भाग्य तू मला दिलंस,
तुझ्या जीवन पुस्तकात स्थान तू मला दिलंस

काही गोष्टी सुखाने उजळल्यात
काही गोष्टी दुःखामध्ये बुडाल्यात
प्रेमात तर सारंच क्षम्य आहे,
सखे, हेच तर अगम्य प्रेम आहे

हा कोसळणारा पाऊस सारं जाणत आहे
या बिलगणाऱ्या वाऱ्याला सारं कळत आहे
तुही आता इतकी अजाण होऊन नकोस,
जाणूनही, माझ्या प्रेमाला नकार देऊ नकोस

माझं मन तुजकडे धाव घेतंय
तुझ्याही मनाची तीच अवस्था असेल
तुझ्या चाहतची नशा सर्वांगी कशी भिनत आहे,
रोमारोमांत, गात्रागात्रात ती कशी मुरत आहे

तुझी धडधड मला ऐकू येत आहे
ही धडकन मला काही सांगत आहे
ओठांतून शब्द जरी फुटत नसले,
तरी त्याचा अर्थ मी जाणत आहे

तुझ्या प्रेमात मी पूर्ण पागल झालोय
तुझ्या अदेने मी संपूर्ण घायल झालोय
प्रेमात पडण्यासारखंच आहे तुझ्यात काही,
लाडके, आज मी फक्त तुझाच झालोय

या पावसात हे काय घडलंय ?
मन माझं, माझं नाही राहिलंय !
या पावसाने तुला मला एक केलंय,
तुझं माझं पवित्र नातं त्याने जुळवलंय

या पावसात हे काय घडलंय ?
मन माझं, माझं नाही राहिलंय !
मनातल्या माझ्या एका लहानश्या कप्प्यात,
तुझ्यासवे मी छोटंसं घरकुल थाटलंय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.08.2023-बुधवार.
=========================================