मळभ आलेली पाऊस प्रेम कविता-हा खेळ पावसाचा सारा,बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा

Started by Atul Kaviraje, August 03, 2023, 10:38:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, मळभ दाटून राहिलेली, थोडीशी उदास अशी पावसातली एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मेरी पहली मोहब्बत है, मेरी पहली ये चाहत है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही गुरुवार-सकाळ        आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मेरी पहली मोहब्बत है, मेरी पहली ये चाहत है )           
----------------------------------------------------------

                "हा खेळ पावसाचा सारा, बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा"
               --------------------------------------------------

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
पहिल्या प्रेमाची पहिली चाहूल देत,
फुलून आला अंगी गोड शहारा

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
उत्कट प्रेम-भावना जागवून त्याने,
माझ्या मन-मोराचा फुलवलाय पिसारा

गात्रागात्री मधू शिरशिरी फुलत
पसरत जाई साऱ्या शरीरा
संवेदनांना नाही बांध इथे,
रोम रोम संबोधिती प्रेम पुष्करा   

देह सारा सुलगत चाललाय
प्रेम तहान वाढवत चाललाय
हा पाऊसही तृष्णा भागवीत नाही,
मना तो तृप्त करीत नाही

ही पावसाळी रात्र बहकत आहे
माझा श्वIसनश्वास महकत आहे
अशावेळी साजणाची याद येत आहे,
मनIस झकझोर करीत आहे

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
अवचित साजणाची देऊन आठवण,
निज उडवलीय प्रथम प्रहरा

ही पहिल्या प्रेमाची जाण
पाऊस सर्वांगी भिनवीत गेला
सजणाचा प्रेमळ कटाक्ष त्या-वरताण, 
सरसरता वारा मुरवीत गेला

साजणाच्या मिठीत जन्नतच मिळाली
त्याच्या प्रेमात राहतच मिळाली
वाटतंय, काळ इथेच थांबावा,
या पावसात तो जखडून रहावा   

असाच माझ्या जवळ तू रहा
साजणा तू माझाच होऊन रहा
काळ लोटुदे, युगे जाऊ देत,
मिठीत तुझ्या सुकून मिळालाय पहा

प्रिया तुला पाहून माझा होशच उडतोय
हा समाही त्यात बेहोष करतोय
आपल्या जल-बिंदूंनी हा लबाड पाऊस,
सजणाच्या प्रीतीपेक्षाही जास्त भिजवतोय

तू सतत समोर राहा, जीवलगा
तू माझ्या समीप राहा, प्रियकरा
बघ पावले वाजताहेत पावसाची हलकी,
चिंब चिंब मज चुंबी अधरI

विपरीत काहीतरी घडेल हातून
माझं मन साशंक आहे
आकंठ प्रणयात बुडून जाऊन,
माझा देह मोहरत आहे

हा पाऊस आपल्याला पागल करतोय
तुला माझ्याकडे अन मला तुझ्याकडे खेचतोय
जाणीव जागत जागवत कळत-नकळत,
प्रीतीच्या ओढीने तुला मला जवळ आणतोय

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
मदहोश करीत, बेभान करीत,
मनाचा करतोय तो कोंडमारा 

इतकी वर्षे दबलेल्या भावनांना
आज पावसाने शब्द दिलेत
दाटलेल्या कंठाने, मिट्ट ओठांतून, 
माझ्या ते प्रवाहित केलेत

तुझ्या प्रीतीच्या पावसात न्हाऊन
तळमळते मन शांत झालेय
प्रिया, तुझ्या चिंब प्रेमानेच माझे,
तगमगते तन निवांत झालेय

आजवर हे ओठ चूप होते
आजवर हे ओठ अशब्द होते
पावसाने मजवर कृपा बरसवीत,
कवितेचे मला स्फुरण दिलेय

पाऊस आणि सजणाची मी आभारी आहे
दोघांनी मला प्रेमाचा मार्ग दाखवलाय
विराण अश्या माझ्या अIजवरल्या आयुष्यात,
बहरलेली फुलबाग फुलवून गेलाय

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
जीवापाड जपलेले अIजवरले माझे,
अंकुरते प्रेम येई आकारा

हा खेळ पावसाचा सारा
बरसवल्यात त्याने प्रेमाच्या धारा
माझे उमलते प्रेम फुलवलंय पावसाने,
घट्ट मिठीत घे तू मला प्रियकरा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.08.2023-गुरुवार.
=========================================