थोडक्यात

Started by mkapale, August 03, 2023, 12:37:15 PM

Previous topic - Next topic

mkapale

थोडक्यात

आजकाल सगळे थोडक्यात आटपायचे असते
लांबलचक शब्दांचे पाल्हाळ मांडायचे नसते

निवांत गप्पा , शांत बसणे वेळ दवडणे असते
फोन वरचे ज्ञान चाळणे हेचि आयुष्य असते

खरे खुरे न हसता ROFL म्हणायचे असते
गोंधळ काय तो फोन मध्ये, घरात शांतता असते

WhatsApp मुळे सगळ्यांना, सगळे माहित असते
Influencer होतो शिक्षक , रोज वेगळी शाळा भरते

विशीत चाळीशी , तिशीत बुध्धीचे सागर व्हायचे असते
थोडक्यात जगतांना लहान मोठे ह्यातलं अंतर नको असते

आईबाबांचा Dude अन बाकी नात्यांचे भरीत होते
घाईत समजायच्या नादात सगळे उमजणे राहून जाते

Life is Short म्हणत इथे का घाईत जगायचे असते
Virtual जगात, खऱ्या स्पर्शाची गल्लत मात्र होत जाते