ठिणगी

Started by mkapale, August 04, 2023, 11:27:46 AM

Previous topic - Next topic

mkapale

ठिणगी

रागीट तो कडक उन्हाळा
शिणवून टाकी जीवाला
ठिणग्या तुझ्या नि माझ्या
देई जन्म दीर्घ वादाला

मेघ,सौम्य नारादापरी ते
आणता संदेश पावसाचे
नकळत विझून ठिणगी
वाजती झंकार प्रेमाचे

थेम्ब गार सुगंधी ते
आग लावी धुंद हवा
ठिणगी लागे पुन्हा ती
अंतर मिटवी गारवा

मग येते गुलाबी थंडी
सकाळ लांबवणारी
आपुल्या दोन जीवांना
एकमेकात पांघरणारी

ठिणगीचा होतो वणवा
मग श्वास एक होती
अंतर होते तरी का
संभ्रमात दोन सांगाती

येतो पुन्हा उन्हाळा
ठिणगी उठते पुन्हा ती
क्षण ते तुझे नि माझे
ऋतूंच्या चक्रात गुंफती