अल्लड थेम्ब

Started by mkapale, August 04, 2023, 12:33:32 PM

Previous topic - Next topic

mkapale

अल्लड थेम्ब

माथ्यावर अलगद तुझ्या
पडला थेम्ब पावसाचा
प्रवास तुझ्या कायेवर त्याचा
बनला विषय कवितेचा

माथा स्पर्शला त्याने
जसा आदर तुझा मजला
सरकताच तो गालावर
विचार खट्याळ मनी आला

अडकला खळीत क्षणभर
जीव अडकतो जसा माझा
वळला ओठांकडे तेव्हा
हेवा वाटला मज त्याचा

तुझ्या नाजूक चेहेर्याशी
केली त्याने जी बदमाशी
द्याया शिक्षा येऊ का जवळ
प्यावया त्यास तुज ओठांशी