पाऊस सुंदरीची प्रेम कविता-पावसाची मजवरी कृपा जाहली, एका सुंदर मुलीची भेट घडवली

Started by Atul Kaviraje, August 04, 2023, 02:27:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसात ती सुंदर मुलगी भेटल्याची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "इक लड़की भीगी-भागी सी, सोती रातों को जागी सी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही नुकताच पाऊस पडून गेलेली, आणि थंडगार वारे वाहत असलेली शुक्रवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( इक लड़की भीगी-भागी सी, सोती रातों को जागी सी )           
---------------------------------------------------------------

              "पावसाची मजवरी कृपा जाहली, एका सुंदर मुलीची भेट घडवली"
             --------------------------------------------------------

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
त्या चिंब रस्त्यावर अंधाऱ्या रात्री,
सौंदर्याने घडलेली जिवंत मूर्ती पाहिली

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
देखणे तिचे लावण्य आरसपानी,
पाहून माझी नजर खिळूनच राहिली

आपल्याच धुंदीत ती चालत होती
भान विसरून ती विहरत होती
जणू एकलीच ती या रस्त्याची राणी,
प्रIषित होती गार पावसाचे पाणी

कुणी नाही, फक्त मी आणि तीच होतो
नकळत तिला, तिच्या पाठीशी होतो
बेभान, धुंद, पाठमोरी ही सुकुमारी,
वळूनही नव्हती पहात ही पथ-परी 

पाहून चिंब तिचे रूप ओलेते
माझे देह्भानच हरपले होते
तेव्हापासून एकच ध्यास होता तिचा,
माझे मन तिच्यात हरवले होते

नावा गावाचा पत्ता नव्हता
जातीचा पातीचा दाखलाही नव्हता
बेफिकिरी, बेदखली मज तिची भावली,
नखरा, अंदाज, अदा बेचैन करून गेली

आता तुम्हीच सांगा मित्रानो
माझी काही चूक झाली का ?
माझे मन तिच्यात केव्हाच गुंतले,
प्रेमात पडणे गुन्हा आहे का ?

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
हा ऋतूच आहे प्रेमात पडण्याचा,
पावसाने आज मला सुंदर भेट दिली

तीच वर्तन थोडं गूढच भासलं
स्वतःशीच बोलणं चकित करून गेलं
बेफिकीर अशी ही नवं-यौवना,
बेफाम, बेलगाम वर्तन थकीत करून गेलं

या पावसात निघण्याचं काय प्रयोजन ?
बहुतेक भिजायला तिला आवडत असावं
म्हणून का रात्र तिने निवडावी ?,
तिला एकटं राहायला आवडत असावं

पण तीच हेच वर्तन मला आवडलं
तिचा बाणेदार स्वभाव मला भावला
तिचा कणखर भाव मला अवचित,
तिच्या प्रेमात गुंतवून, गुंगवून गेला

आता ती मला अजनबी नव्हती
आता मीही तिला अनोळखी नव्हतो
तिच्याही डोळ्यात माझ्यासाठी वाहणारा,
प्रेमाचा झरा पहात होतो

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
मनात माझ्या प्रीतीचे बी रुजून,
पाहता पाहता ती इवलुश्या रूपात अंकुरली

वाटत होत ती रस्ता भटकलीय
या झरत्या पावसात ती वाट चुकलीय
पण तिचे कदम फक्त डगमगत होते,
तिचे पाऊल बहकत, वाकडे पडत होते

ती ईठलत होती, ती बलखत होती
ती पूर्णपणे तिच्या होशमध्ये होती
या धुंद सरींच्या ती पूर्ण कब्जात होती,
पावसात भिजण्याची मजाच काही और होती

त्या सुन्या रस्त्यावर ती एकटीच होती
अश्या या पावसात ती मला दिसली होती
रहस्यमय अशी ती बेधुंद सुंदरी,
पावसात भिजत चालली होती

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
त्यारात्रीच्या पावसाच्या संतत जलधारांत,
ती मुक्त, आनंदी, स्वैर नहIत होती

मला सांगा कुणी सतत असं भिजत का ?
कुणा बालकापरी पावसात असं बागडत का ?
अजाण स्वभाव मला तिचा आवडला होता,
निरागस भाव मला तिचा भावला होता

केसांच्या बटातून पाणी झिरपत होते
अंगावरचे वसन घट्ट चिकटत होते
पण याची शुद्ध तिला कोठे होती ?,
बेभान अशी ती चिंब भिजत होती

मध्येच थांबत होती, मध्येच धावतं होती
डौलदार चालीने सरींशी खेळतं होती
अल्लड बालिकेपरी बागडणारी ती,
तिला कुणाचीही पर्वा दिसत नव्हती

तिची हीच अदा मला बेभान करीत होती
हळू हळू मला तिच्याकडे खेचत होती
तिचा प्रत्येक हावभाव, दिलखेचक अदा,
मला तिच्या प्रेमात पाडत होती

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
त्या रात्रीच्या एका अचानक भेटीने,
माझ्या जीवनात एक सुंदर पहाट उगवली

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
जणू स्वप्नच होते त्या रात्री पडलेले,
पुढली पहाट सत्यात उतरून गेली

पावसाची मजवरी कृपा जाहली
एका सुंदर मुलीची भेट घडवली
आजही मला ती रात्र चांगलीच आठवतेय,
ती भेट आज पती-पत्नीच्या नात्याने गुंफली 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.08.2023-शुक्रवार.
=========================================