पावसातली प्रेम कविता-सजणे, हा पाऊस काय सांगतोय,तुझ्या गोड बोलण्याने तोही डोलतोय!

Started by Atul Kaviraje, August 05, 2023, 10:42:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली या दोन प्रेमींची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में,ऐसी बरसातो में, कैसा लगता है ?"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही निरव, शांत असलेली आणि तुरळक पाऊस पडणारी शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में,ऐसी बरसातो में, कैसा लगता है ? )           
----------------------------------------------------------------------

         "सजणे, हा पाऊस काय सांगतोय, तुझ्या गोड बोलण्याने तोही डोलतोय !"
        ---------------------------------------------------------------

सजणे, हा पाऊस काय सांगतोय
तुझ्या गोड बोलण्याने तोही डोलतोय !
इतकी मिठास आहे तुझ्या गाण्यात,
तुझ्या मधुर आवाजाला तोही तरसतोय !

सजणे, हा पाऊस काय सांगतोय
तुझ्या गोड बोलण्याने तोही डोलतोय !
तुझ्याही प्रेमात पडलाय तो जणू ,
पडता पडता तुला प्रेमे बिलगतोय !

सजणे, हा पाऊस काय सांगतोय
काय आहे त्याचा गर्भित इशारा
जणू तुझ्यासाठीच आहे त्याचे कोसळणे,
तुला चिंब चिंब करून टाकतोय !

ही रात्र पहा अंधारून आलीय
पावसाच्या धारानी जणू मोहरलीय 
पावसाच्या संततधारेत तुझ्या थिरकण्याने,
पाहता पाहता ती अधिकच बहरलीय

     साजणा, आता पुरे झाला तुझा बहाणा
     तू मला वाटतोयस अति अति शहाणा
     पावसाचे नाव घेऊन तू ढग बनून वाहतोस,
     आणि चिंब भिजवत मला बळे बळे छेडतोस

     साजणा, तुला का मी ओळखत नाही ?
     तुझी पावसातली अलगच अदI राही
     पाणी उडवायचे, भिजवायचे, चिंब करायचे,
     आणि वर त्या पावसाचे नाव घ्यायचे

     प्रिया, हे आकाश जणू होळी खेळतंय
     क्षितिजी तिरपे इंद्रधनू सप्तरंगात नहIतंय
     शीत गारांसवे आपल्यावर रंगाची बरसात करतंय,
     गIर शार सरींनी जणू धरित्रीला धुंद करतंय

     हा पाऊस तुला भिजवतोय, मला भिजवतोय
     रस्त्यात, बागेत, अंगणात आणि छतावरही
     त्याला काहीच बंधन नाही, रोक नाही,
     बस फक्त चिंब कसे करायचे हेच पाही

प्रिये, असं वाटतंय तू जणू घटाचं आहेस
आपल्या प्रियकरास भिजविण्यात तू गुंग आहेस
त्याच्यासवे ही तू जलधारांची होळी खेळत आहेस,
त्याला भिजवता भिजवता तू स्वतःही भिजत आहेस

प्रिये, इतकी नकोस भिजू, ये जवळ ये
बघ थंडी वाढत चाललीय, माझ्या मिठीत ये
या पावसाने मला आणखी एक बहाणा दिलाय,
तुला जवळ घेण्याचा, ऋतूचा इशारा मला मिळालाय 

आता अधिक वेळ दवडू नकोस
या पावसात अशी सतत भिजू नकोस
हा मुसळधार पाऊस सांगतोय मला,
जणू प्रेमाचा पाठ शिकवतोय मला

हा पावसाचा मोसम हवाहवासा आहे
हा ऋतू प्रेमातच पडण्याचा आहे
प्रिये, पहा काय नजIरI आहे त्याचा,
दिलखेचक, दृष्टिपथातील लांबवरल्या हिरवाईचा

     प्रियकरI, वाटतंय काहीतरी घडून राहील
     काली  घटI अधिकच दाट होईल
     वाऱ्याच्या झंझावाताने वावटळ तयार होईल,
     आपणा दोघांना तो दूर दूर उडवून नेईल

     या पावसाने आपणास एक केलेय
     आपले जीवन आता सुरेख झालेय
     या पावसाचे ऋणीच आहोत आपण,
     आपले जीवन आता अर्थपूर्ण झालेय

सजणे, हा पाऊस काय सांगतोय
तुझ्या गोड बोलण्याने तोही डोलतोय !
बस तू अशीच मधुर बोलत राहा,
तू अशीच पावसाल डोलवत राहा

सजणे, हा पाऊस काय सांगतोय
तो तुझ्या माझ्या प्रीतीचे गाणे गातोय
आपली प्रीत पाहून तोही सुखावतोय,
तो भिजवतोय, भिजताना उडालेली तारांबळ पाहतोय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.08.2023-शनिवार.
=========================================