प्रेम कविता-नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला, तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला

Started by Atul Kaviraje, August 07, 2023, 10:58:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक सुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "ना है ये पाना ना खोना ही है, तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाउस थांबलेली आणि उजळ असलेली                       सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ना है ये पाना ना खोना ही है, तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है )           
-----------------------------------------------------------------------

        "नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला, तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला"
       ----------------------------------------------------------------

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
आपल्या अमृतधारानी त्याने चिंब भिजवलंय,
आपल्या मनात त्यानेच प्रेम जIगवलंय

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
प्रिये, जीवन अर्थपूर्ण झालंय आपलं,
या पावसाने आपल्याला सर्व काही दिलंय

या पावसानेच आपली भेट घडवली
या चिंब पावसातच आपली गाठ पडली
पावसाचा खूप जीव आहे माझ्यावर,
तेव्हापासून माझा जीव जडला तुझ्यावर

त्याग काय हे मी पावसापासून शिकलो
दानत काय हे मी त्याच्याकडून शिकलो
आज मी काही न घेता फक्त देतोय,
पावसाकडूनच मी हा धडा गिरवतोय

माझं प्रेम तुला मिळालंय, प्रिये
निर्व्याज्य, कशाचीही अपेक्षा न धरता
मी फक्त तुझाच झालोय, लाडके,
पावसानेच शिकवलंय मला पडता पडता

दिवसाची सुरुवात तुला पाहूनच होते
संध्या-छायेची चाहूल तुला पाहूनच लागते
माझ्या आयुष्याची तू पहाट-संध्याकाळ आहेस,
माझ्या जीवनाचा तू जीवन-क्रम आहेस

तूच माझा निरंतर श्वास आहेस
तूच माझा अविरत ध्यास आहेस
जीवन जगणं तुझ्याकडून मी शिकलोय,
आयुष्यात फक्त तुझाच होऊन राहिलोय

तुझ्या डोळ्यात पाहता मला
तुझे माझ्यावरले अक्षय प्रेम दिसतंय
तुझा एकच प्रेमळ दृष्टिक्षेप,
जणू माझ्या मनाचा ठाव घेतोय 

या पावसाच्या धारांत मी चिंब भिजतोय
तुझ्या प्रेमाच्या धारांत मी मुक्त नाचतोय
दोघांनीही मला निव्वळ प्रेमचं दिलंय,
दोघांनीही माझं जीवन घडवलंय

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
एक तोच आपले प्रेम जाणणारा,
त्याने एक केलंय तुला आणि मला

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
आपल्या या प्रेमाचा तोच साक्षी आहे,
प्रिये, सोडून तर जाणार नाही ना तू मला ?

तुझ्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतोय
तुझ्यावर प्रेम करावस वाटतंय
तुझ्या मदहोश नजरेला नजर द्यावीशी वाटतेय,
तुला घट्ट घट्ट मिठीत घ्यावस वाटतंय

आज मी शुद्धीत, भानावर नाही
आज माझं मन बेभान झालाय
मन तुझीच गोष्ट मला सांगत आहे,
गोष्ट ऐकता कधीच रात्र उलटून जात आहे

आज पावसाने मला नखशिखांत भिजवलंय
आज पावसाने मला हुडहुडत गारठवलंय
त्याच्या प्रत्येक जलबिंदूत मला तुझीच छबी दिसतेय,
त्याच्या जलधारांत तुझीच प्रतिमा भासतेय 

आज पावसात जिथे तिथे तुझीच तसवीर पाहतोय
पावसाने जणू माझी नजरबंदीच केलीय
पावसाच्या जलधारांत तुझा पाय नृत्याने थिरकतोय,
थिरकत थिरकत अवचित जणू तू गिरकीच घेतलीय

एवढा मुसळधार पाऊस पडतोय खरा
पण त्या आवाजातही एक खामोशी जाणवतेय
या आवाजाची एवढी नशI जडलीय मला,
होषच उडालेत माझे, मला बेहोशी येतेय

तुझ्याशी केले प्रेमाचे वादे
होते सारे पूर्ण, नव्हते अधुरे आधे 
माझी वफाईचं होती याला कारण,
तुझं प्रेमचं होत याला प्रमाण

हा जो अतूट धागा जुळलाय प्रेमाचा
या ज्या अभंग तारा जुळल्यात प्रीतीच्या
त्या नाहीत कधी तोडता येणार,
त्या अधिकाधिक जुळत राहणार

तूच माझी ती अंतिम मंजिल आहेस
तूच माझ्या नौकेची साहिल आहेस
तुझ्यामुळेच मी घडलोय राणी,
तुझ्या प्रेमाचा मी आहे शतशः ऋणी

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
माझे अपूर्ण आयुष्य आज पूर्ण झालंय,
नमस्कार आहे माझा या पाऊस देवाला

नवजीवन पावसाने दिलंय आपल्याला
तुझ्या आणि माझ्या चिरंतन प्रेमाला
असाच तू पडत राहा, प्रेमिकांना जोडत राहा,
तुझ्या दर्शनाची आस आहे प्रत्येक पावसाळ्याला

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.08.2023-सोमवार.
=========================================