ती येते

Started by mkapale, August 07, 2023, 11:08:08 AM

Previous topic - Next topic

mkapale

ती येते

तर्क आणि भौतिक शास्त्र
वाटू लागते थोतांड
ती येते आणि सर्व बिघडते
विसरून जातो ब्रह्मांड

ती येते

असुनी नाजूक कोमल काया
घाव जीवावर करते तीचे हसू
पावसाच्या सरीत भिजरी जर ती
पाणी पेटले,असे लागते भासू

ती येते

भारी भरकम शरीर असे माझे
वाटे तरी मी लागलो पिसांगत वाहू
नजरेत तिच्या जादू अशी कि
शराऱ्याने हात पाय ते कापती बहू

ती येते

आवाज तिचा मधुर जशी साखर
ऐकताच मला गवसती सारे सूर
मित्र माझे जिवलग पाहती तिला
वाटू लागती नकळत का ते असुर

ती येते

कधी न पडले स्वप्न मला तोवरी
रोज जातो चंद्रावरती तिला घेऊन
नाव एकदा घेतले होते तिने तेव्हा
गेलो होतो वाफेपरी मी विरघळून

ती येते

न पिता , राहतो रोज मी नशेत
दिसत असुनी, गोष्टी नाहीश्या होत
नाव माझे इतकी वर्ष जगलो आहे
नाव तिचे बरळत असतो मी झोपेत

ती येते

नकळत जाती पाय तिच्या मागे आता
जाते वाचा , चुकून तिने वळून पाहता
विद्यार्थी मी शास्त्राचा तरी कला आवडे
होत्याचा मी नव्हता झालो तिला भेटता