पाऊस सुंदरीची कविता-स्मरणात आहेअजुनी रात्र पावसाळी,सृष्टीला आलीहोती हिरवीनव्हाळी

Started by Atul Kaviraje, August 08, 2023, 10:02:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसात भेटलेल्या सुंदरीची एक कविता-गीत ऐकवितो. "ज़िंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, एक अंजान हसीना से मुलाकात की रात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही शांत, सुंदर, रम्य आणि नुकताच पाऊस पडून गेलेली मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ज़िंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, एक अंजान हसीना से मुलाकात की रात)           
-------------------------------------------------------------------------

         "स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी, सृष्टीला आली होती हिरवी नव्हाळी"
        ---------------------------------------------------------------

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
सृष्टीला आली होती हिरवी नव्हाळी
पावसाच्या धारांत ती नहात होती, सजत होती,
रात्रीच्या त्या अनोख्या रूपात ती भिजत होती

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
सृष्टीला आली होती हिरवी नव्हाळी
त्या निसर्गाचा एक आविष्कार माझ्या नजरेस आला,
कुण्या तरुणीचा पदर वाऱ्यासवे वर उडाला

मग्न,निमग्न ती चिंब भिजत होती, तुषार उडवीत होती
स्वतःच्याच धुंदीत केसांवरले पाणी निचोडत होती
जणू श्वेत वसनातील अप्सराच कुणी भूतली आली होती,
सिंहकटीस बलखावीत नागिणीसम नृत्यात मग्न होती

मजसमोर सौंदर्याचा खजिना जणू ठेवला होता
जणू कुणा कुशल हस्ताने लावण्याचा साज घडविला होता
मोहित, अनिमिष नेत्रे माझी नजर खिळून गेली होती,
बेहोष, बेभान असा मी, माझा पुतळाच झाला होता

तिच्या त्या रेशमी कृष्ण-कुंतलावरून ओघळते पाणी
ओघळत, थोडे थांबत, गुलाबी गालांवरले ठिबकते पाणी
चिंब ओल्या कपड्यात ती लावण्याची मूर्ती भासत होती,
वर तिची भरगच्च कायI तिच्या सौंदर्याची चुगली करीत होती

काहीबाही विचारांनी माझ्या मनात गर्दी केली
अकस्मात एक भिरभिरती वावटळ मनात गिरकीत अIली
भावभावनांचा गदारोळ मनात दाटी करून गेला,
तिची ती अजब अदा, नखरा मजसी मोहित करून गेला

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
सावळी भासत असली तरी होती ती गर्द काळी
आणि अश्या रात्रीत तिचे सौंदर्य नहात होते,
बेधुंद झालेल्या माझ्या मनाला विचलित करीत होते

अचानक विद्युलता लख्खकन चमकून गेली
आपल्या रुपेरी प्रकाशात तिचा बावरा चेहरा दाखवून गेली
अन अकस्मात ती गोष्ट पाहता पाहता घडली,
घाबरलेली तिची कायI माझ्या घट्ट मिठीत थरथरू लागली

काय घडतंय कळायला थोडा उशिराच झाला
लाजेचा पडदा तिच्या चेहऱ्यावर झटकन झळकला
हलकेच होत दूर, लज्जेस घेऊन ती सुदूर,
आपल्या नितळ गोऱ्या गोजिऱ्या हातानी चेहरा तिने झाकला

अवाक मीही होतो पाहत, काहीच उमजून न आले
अकस्मात निमिषार्धात ते एक सुंदर स्वप्नच जणू भासले
मनाच्या एका कोपऱ्याने सुंदर तान छेडली होती,
प्रेमाची एक अपिरिचित धून माझ्या मनात गुणगुणू लागली होती

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
फुलून आल्या होत्या वनराई, पाणी साचले होते तरुतळी
साचलेले पाणी छपरावरले, वाहत होते पागोळी,
रस्त्यावरली खड्डयामंध्ये डुबुक डुबुक साचत होते तळी

अवचित तिने पदरावरले साचलेले पाणी निचोडले
अन वाहणाऱ्या केशांवरले ओघळते पाणी झटकले
तिचा तो यत्न त्या संततधारेत फुकाचा ठरत होता,
पाऊस तिला भिजविण्यात काही मागे हटत नव्हता

पण तिच्या या अदेने मला पूर्ण पागल केले
माझ्या दिलाला जणू शर-संधानाने विच्छेदित करून गेले
आता मला हा शीत पाऊसही असह्य वाटू लागला,
माझ्या मनाला तनाला जणू तो आग लावून गेला

आता  माझ्या मनाचे हाल पाहण्यासारखेच होते
मन आता माझे नव्हते, केव्हाच परके झाले होते
ती दाहक रात्र मला जIळू लागली, पोळू लागली,
अंतर्बाह्य ज्वाळांनी तप्त, जहाल चटके देऊन गेली

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
अन त्या पावसात भिजणारी ती अनामिक सुंदरी
रुप्याचे रूप तिचे अवतीर्ण, अन कायI सोनसळी,
जणू धरेवर अवतरली होती अस्मानातली परी

माझ्या स्वप्नात येणारी तीच तर सुवर्ण-सुंदरी होती
त्या पावसात स्वैर तरण करणारी तीच तर जल-परी होती
ती तीच होती, लावण्याने मुसमुसलेली सुवर्ण-खदान होती,
पाऊस अंगावर घेणारी, शुभ्र वसन ल्यालेली आकाश-देवीचं होती

माझ्या कवितेतील कडव्यांची तीच तर चारोळी होती
माझ्या सुस्वर गाण्यात तिचीच स्वरात भिजलेली ओळी होती
माझ्या स्वप्नांत आजवर येणारी प्रतिमा तिचीच तर होती,
आज पावसात तिची खूबसूरत तसबीर समोर प्रकट झाली होती

आजच्या रात्रीला एक खुमार होता, एक नशाच अIली होती
आजची रात्र रात्र नव्हती, सुंदर स्वप्नांची मालिकाच होती
ती अनामिक सुंदरी त्या मालिकांची जिवंत मलिका होती,
सळसळत्या बिजलीसम शुभ्र रुपेरी प्रकाश फेकणारी शलाकाच होती

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
आठवणीत आहे अजुनी ती रात्र वादळी
अवचित भेटलेली ती एक अनामिक रमणी,
अन तिच्या चंचल अदेने फुललेली ती पावसाची फुलदाणी

स्मरणात आहे अजुनी रात्र पावसाळी
विसरू पाहता तरी विसरत नाहीय मी आजही
पुन्हा कधी भेटेल का ती हसीन अनामिकI ?,
तिच्या भेटीची आहे मज आजही आस दर पावसाळी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2023-मंगळवार.
=========================================