गूढ

Started by mkapale, August 08, 2023, 07:09:32 PM

Previous topic - Next topic

mkapale

गूढ

खोलात कुठे तरी दडून आहे
मी तुज्यात आहे तुज्यात आहे

रस्ते ओळखीचे मी भयाण करते
छोट्या पोकळीचे भुयार करते

वळून पाहता सावली ती दिसते
तिला मी गूढ, काळीशार बनवते

काळोखात भान तुझे वेधते
जे नसते तेही तुला दर्शविते

ठोके चुकवी जरी असे तो भास
सुचेना काही अन रोखलेला श्वास

अंतरंगात दाबून ठेवली कितीही
अवतरते नाजूक वेळी कधीही

येतेच माझी एकदा तरी प्रचिती
थरकाप सोडी ,नाव माझे भीती

अनादी अनंत मी एक शक्ती
करू नये माझी कोणीही भक्ती