पाऊस-गीत-विसरू कशी मी ती रात्र पावसाची, एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 10:59:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली अंजान मुसाफिराच्या भेटीची एक कविता-गीत ऐकवितो. "ज़िंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात,एक अंजान मुसाफ़िर से मुलाक़ात की रात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही कृष्ण मेघांनी ढगाळलेली बुधवार-सकाळआनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ज़िंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात,एक अंजान मुसाफ़िर से मुलाक़ात की रात )           
-------------------------------------------------------------------------

    "विसरू कशी मी ती रात्र पावसाची, एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची"
   ---------------------------------------------------------------------

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
अवचित पडली गाठ त्यादिनी माझी आणि त्याची,
ती रात्र होती मुसळधार पावसाची, बोचऱ्या वाऱ्याची

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
त्या एकाच क्षणी घडलेल्या एकटक दृष्टादृष्टीची,
आणि मग झालेली जाणीव प्रेमात पडल्याची

पाहता त्याला मी माझीच नव्हती राहिले
त्याच क्षणी मी त्याला माझे होते सर्वस्व वाहिले
काही खास होते त्याच्या व्यक्तिमत्त्वात भरलेले,
मर्दानगीचा पुतळा होता तो, रूप त्याचे मनात ठसलेले 

अन अवचित माझे हृदय धडकू होते लागले
काहीतरी चमकून गेले होते, विपरीतच भासू लागले
भावभावनांचा हलकल्लोळ माजवून गेला उचंबळत्या मनात,
लख्खकन वीजच चमकून गेली देहाच्या गात्रागात्रात

काय होतंय मला काहीच कळत नव्हते
आकलनाच्या पलीकडेच मी जणू गेले होते
त्या पावसात त्याच्याकडे निस्तब्ध अशी पाहत होते,
त्याचे ते मिश्किल हास्य मला काही विदित करीत होते

पाहता पाहता मी त्याच्या प्रेमात पडले होते
कह्यात नसलेले मन त्याच्याकडे ओढ घेत होते
कितीही थांबवले तरी ते थांबतच नव्हते,
त्याच्या नजरेच्या गहराईचा ते ठाव घेत होते

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
माझ्या प्रथम प्रेमाची जाणीव मला झाली होती,
माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात तेव्हाच झाली होती

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
आजवर मनात जपलेली ती माझ्या प्रियकराची तसवीर,
आज खरी मूर्तिमंत माझ्या समोर प्रकट झाली होती

आणि माझं मन रंगीबेरंनी तराणे छेडू लागलं
त्याला पाहून मला प्रेमाचे गाणे सुचू लागलं
त्याच्या एक कटाक्षाने तनूवर मोरपीस जणू फिरू लागलं,
त्या पावसाच्या संततधारेत माझं मन त्याच्यात हरवून गेलं

माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेमाचे ढग दाटूनआले
पाहता पाहता पाणी पापण्यांच्या कडांत काठोकाठ भरून आले
पावसाच्या बिदूंनी गालावरल्या आसवांना संमिश्र केले,
अन एकत्रितपणे ते मुक्त ओघळू लागले, वाहू लागले

काय घडतं होतं, हे कळण्याच्या दूर मी गेले होते
आठवतं होते तेव्हा, त्याच्या पाठोपाठ मन जात होते
शरीराला भान नव्हते, ते त्याला स्पर्श करू पहIत होते,
ते त्याच्यात गुंतत होते, त्याच्यात एकरुप होऊ पहIत होते

हि माझी बेभानावस्था मग बराच काळ टिकून होती
परिस्थितीचे मला भान नव्हते, नजर फक्त त्यालाच पाहत होती
भानावर आले तेव्हा माझीच मी ओशाळले, लाजले,
त्याच्यापासून दूर होत मग मी भानावर आले होते

त्याचा तो मर्दानी स्पर्श मला अनोख्या दुनियेत घेऊन गेला
त्याची ती कव, त्याचा तो रव मला मोहित करून गेला
आज मला प्रेमाचा मधुर गंध गंधित करून गेला,
त्या अनामिक मुसाफिराचा बंध बंधित करून गेला

आता तो अंजान मुसाफिर मला अनोळखी नव्हताच
सातI जन्माचा परिचय मला त्याचI अन माझा देऊन गेला
ती पावसाळी रात्र मला एक नवं-जीवन देऊन गेली,
उद्याच्या पहाटेची पुन्हा नव्याने जगण्याची जाणीव करून गेली

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
तो कोसळणारा पाऊस त्या रात्री मला काही देऊन गेला,
पडतI पडतI माझ्या मनात प्रेम भावना जागवून गेला

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
त्या रात्रीचा तो क्षण आजही माझ्या स्मरणी आहे,
त्या एक क्षणाने माझे अभंग प्रेम जागविले आहे

विसरू कशी मी ती रात्र पावसाची
एका अंजान अनामिक मुसाफिराच्या भेटीची
कुणीतरी माझ्या जीवनात अवचित प्रवेश केला होता,
माझ्या जीवनाला, माझ्या जगण्याला आता अर्थ आला होता

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================