दिन-विशेष-लेख-जागतिक आदिवासी दिन-C

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:11:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक आदिवासी दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे. ९ ऑगस्ट-हा दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             जागतीक आदिवासी दिन सूत्रसंचालन--

     संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तुत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांच, प्रमुख अतिथींच, उपस्थित मान्यवरांच आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो

    स्वागतम स्वागतम  स्वागतम !!

                  मान्यवरांचे स्वागत:--

स्वागत चारोळी क्रमांक १--

कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असाव लागतं
आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठ मन असाव लागत.

रसिकहो कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री ( मान्यवरांचे नाव) वेळात वेळ काढून आज आपल्यात उपस्थित आहेत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूयात.

स्वागत चारोळी क्रमांक 2--

बोली ने चाली ने निकोप शुद्ध,
ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही,
कर्तृत्व अफाट उदात्त ध्येयी

अतिथी म्हणून असे मान्यवर आपल्याला या कार्यक्रमात लाभले आहेत...

                दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन:--

      दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना हया चारोळ्या म्हणायच्या--

अतिथीच्या आगमनाने उजळले भुवन,
दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण !
बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन,
संस्कृतीचा सन्मान करूयात दीपप्रज्वलन....."

"भ्रष्टाचार, अज्ञानाचा अंधार दूर सारण्या,
मनामनात देशप्रेमाचा दीप पेटवूया !
करुनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन,
तेज कार्यक्रमाचे वाढवूया...."

संस्कृती आहे आपली प्रकाशाची
शितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
अशा या प्रसंगी मी मान्यवरांना
दिपप्रज्वलनासाठी विनंती करतो..

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याच्यावेळी वापरायची चारोळी :--

समोर अशी गर्दी असली,
त्यात माणस दर्दी असली
सोहळा सुंदर होणारच वेळ जरी अर्धी असली !

--Yogesh more
-----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी दुनिया.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================