प्रेमिकेची कविता-तू जवळ आहेस, तू हसत आहेस, वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस

Started by Atul Kaviraje, August 10, 2023, 10:37:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली प्रेमिकेची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "तुम पास आये, यूँ मुस्कुराये, तुमने न जाने क्या सपने दिखाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही कृष्ण मेघाच्छादित व सोबत ऊनही असलेली गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( तुम पास आये, यूँ मुस्कुराये, तुमने न जाने क्या सपने दिखाये )           
----------------------------------------------------------------------

        "तू जवळ आहेस, तू हसत आहेस, वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस"
       ---------------------------------------------------------------

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
पावसाच्या पडद्याआडून तू मला पहIत आहेस,
लहरत्या पदराआडून तू मला बोलावत आहेस

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
हा भास आहे, की सत्य काहीच नाही कळत,
पण मला सतत तुझा हासभास होत आहे

हे उडणारे तुषार मला तुझं अस्तीत्व दाखवीत आहेत
या शीत जलधारा मला तुझी तसबीर दाखवीत आहेत
मी स्वप्नात नाहीच मुळी, माझी जाणीव मला सांगत आहे,
पण नकळत कुठंतरी काहीतरी उणीव मला जाणवत आहे

जागेपणी मी तुझेच स्वप्न पहIत आहे
अर्धोन्मीलित नयनात तुझीच छबी दिसत आहे
हे आज काय होतंय मलाच कळत नाही,
पण मनात आत कुठेतरी काहीतरी होत आहे

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
तुझा आभास आहे, की तुला जणू मी पाहत आहे,
हा पाऊस आज मला काही किमया दाखवीत आहे

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
तुझी नजर माझ्या मनाचा ठाव घेत आहे,
तुझे ओठ जणू माझेच नाव घेत आहे

तुझ्या स्वप्नात मी चक्क रममाण होत आहे
माझे दोलायमान मन बेभान होत आहे
काय करावं अन काय करू नये,
या द्विधा मनःस्थितीत मी पुरता अडकलेI आहे

हा कोणता अगम्य एहसास होत आहे मला
ही कोठली अनबुझी प्यास लागत आहे मजला
ही माझी न शमणारी तृष्णा कोण शमवेल ?,
या साऱ्याचे आकलन मला कोण बरं करेल ?

या प्रेमाची नशI मला कोठवर घेऊन जाईल ?
माझ्या मनात ती कितपत खोलवर जाऊन मुरेल ?
मी आता या नशेच्या जणू पूर्ण कह्यात आहे,
बेहोष, बेभान, माझे मन प्रेमाने काबीज केले आहे

आज माझा चैन, अIराम कुणी हिरावून घेतलाय
मनाची तळमळ, तगमग, व्याकुळता वाढत चाललीय
त्यात हा बेधुंद पाऊस मनIस आणिक धुंद करीत आहे,
माझ्या या अनोख्या स्वप्नांत मला खोलवर नेत आहे

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
इतकं असूनही तू मला दूरच भासत आहेस,
अशी कोणती शक्ती मला तुझ्यापासून दूर ढकलत आहे ?

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
तुझे दोन्ही बIहू फैलावून तू मला बोलावीत आहेस,
तुझ्या मिठीत सामावण्यास मी अत्यंत बेचैन आहे

आता पावसाने अधिकच जोर धरला आहे
माझे मन अत्यंत बेचैन, बेलगाम होत आहे
तुला मला प्राप्त करायचेय, मी अधीर होत आहे, 
तुला मिळवता मिळवता माझा धीर सुटत चालला आहे

हे प्रेम माझ्या मनात कधीचे फुलत होते
कुणीतरी भेटेल कधीतरी, या आशेवर ते जगत होते
आजतोवर तुझ्याच स्वप्नांत ते मश्गुल होते,
माझे हे अबोध दिल तुझ्यावर पागल झाले होते

एकलेपणाच्या अंधारात प्रेमाचा प्रकाश शोधत होते
माझे मुरझलेले प्रेम-फुल बहराच्या शोधात होते
पावसाच्या निमित्ते आज प्रेम-ऋतू फुलून आला होता,
माझ्या स्वप्नाला आज सत्याचा आधार मिळाला होता

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
आजही ही जाणीव मला प्रकर्षाने होत आहे,
आत्यंतिक तीव्रतेने आयुष्याची उणीव भरून काढत आहे

तू जवळ आहेस, तू हसत आहेस
वर्षणाऱ्या धारांत तू मला दिसत आहेस
तू तर केव्हाच माझ्या मनात होतीस, माझ्यात आहेस,
आज माझ्या मनाचा बांध फुटून प्रवाहित होत आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.08.2023-गुरुवार.
=========================================