पाण्याची साथ

Started by mkapale, August 10, 2023, 04:08:12 PM

Previous topic - Next topic

mkapale

पाण्याची साथ

काही क्षण शांतता तुलाहि मलाही
मी इथेच थांबलो अन तू तिथेच थांब
आहे ते राहील जसं आहे तसं ताजं
बरं आहे उगीचच जाण्यापेक्षा लांब

उमगलं, काळं पांढरं नसतं काही
अनेक छटांनी सजत असतात नाती
कुशंका अपेक्षा उपेक्षा ह्यापेक्षा
कधी, न बोलून बरे जातात दिवस राती

मला आता मी असल्याचा येतोय राग
गोंधळलोय तो आणि तीतल्या फरकात
मला तू होता येईना आणि तूला मी
फरकाने पडेल फरक वाटलं नव्हतं स्वप्नात

शेवटी वेगळा असल्याने पडलो मी वेगळा
समजून काय घ्यायचं त्याचाच नाही पत्ता
खुश आहे मी, तुला आहेत समजणारे फार
आधीही होतो अन पुढेही राहीन मी एकटा

जेही गेले ते दिवस विलोभनीय होते
त्यांना चाळत कधी कधी शोधीन सुख
जसे आले तसे गेले वाहत नितळ पाणी
त्यात स्थिरता मागितल्याने झाली चुकामुक